Manasvi Choudhary
आजकाल फिट राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सॅलड, सँडविच आणि ज्यूसचे सेवन केले जाते यासाठी अनेक भाज्या कच्च्या खाल्ल्या जातात. मात्र तुम्हाला माहितीये का? कच्चा भाज्या खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. अनेकांना कच्चा भाज्या खायची सवय असते. सॅलड किंवा सॅन्डविचमध्ये शिमला मिरची, ब्रोकोली या भाज्या कच्च्या खाल्ल्या जातात. मात्र कोणत्या भाज्या कच्चा खाऊ नये ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अनेकांना कच्ची कोबी खायला आवडते. चायनीज पदार्थांमध्ये कच्ची कोबीचा वापर अधिक केला जातो. मात्र कच्चा कोबी खाण्यापूर्वी स्वच्छ करणे महत्वाचे आहे.
कच्चा कोबीमध्ये लहान लहान कीटक असू शकतात जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.
ब्रोकोली ही भाजी पोषण तत्वांनी परिपूर्ण आहे. मात्र कच्ची ब्रोकोली कधीही खाऊ नये यामुळे पोटात गॅस, पोटफुगी होऊ शकते.
पिझ्झा आणि सँडविचमध्ये कच्चा शिमला मिरचीचे सेवन केले जाते. मात्र कच्च्या शिमला मिरचीमध्ये धूळ, माती आणि किटकनाशके असू शकतात यासाठी शिमला मिरची स्वच्छ धुवून शिजवून खा.
अनेक सॅलडमध्ये किंवा ज्यूसमध्ये कच्चा पालकचे सेवन करतात. पालकमधी खनिजे, जीवनसत्व शरीराठी फायदेशीर आहे. मात्र कच्चे पालक खाणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.