Tecno Spark Go 1 SAAM TV
बिझनेस

Tecno Spark Go 1 : 8GB रॅम अन् LCD डिस्प्लेसह Tecno चा नवा स्मार्टफोन लाँच ; फीचर्स पाहताच क्षणी खरेदी कराल

Tecno Smartphone Specifications : टेक्नोच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! Techno Mobile ने आपला नवीन स्मार्टफोन Techno Spark Go 1 देशात लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 5000mAh बॅटरी आहे.

Shreya Maskar

Tecno Mobiles स्मार्टफोन कंपनीने अलीकडेच स्पार्क सीरीजच्या आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. याची संपूर्ण माहिती Tecno Spark Go 1 ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

Tecno Spark Go 1 मध्ये कंपनीने 8GB रॅमसोबत LCD डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची डिझाईन एकदम स्टायलिश आहे आणि कंपनीने हा 13-मेगापिक्सल कॅमेरा (Camera Quality) सह लाँच केला आहे.

स्टोअरेज

टेक्नोच्या Tecno Spark Go 1 नवीन स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. तसेच हा स्मार्टफोन पंच-होल कटआउट फीचरसह लाँच करण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz चा रिफ्रेश दर देतो. तर Tecno Spark Go 1 Unisoc T615 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 6GB+64GB स्टोरेज, 8GB+64GB स्टोरेज, 6GB+128GB स्टोरेज, 8GB+128GB स्टोरेज सारख्या प्रकारांमध्ये लाँच केला आहे.

कॅमेरा क्वालिटी

Tecno Spark Go 1 मध्ये कंपनीने 13MP प्रायमरी कॅमेरासोबत सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय, स्मार्टफोनच्या मागील पॅनलवरील वर्तुळाकार कॅमेरा आयलंड फीचर पाहायला मिळते.

पॉवरफुल बॅटरी

Tecno Spark Go 1 या फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी (Battery Quality) देण्यात आली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. कंपनीच्या मते, या फोनमध्ये पॉवर बटणावर डबल टॅपसह फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.

किंमत काय?

अद्याप कंपनीने Tecno Spark Go 1 या स्मार्टफोनची किंमत जाहीर केली नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT