Car Loan Interest: नवीन कार घ्यायचा विचार करताय? या बँका देतायत सर्वात कमी व्याजदरात लोन; वाचा संपूर्ण लिस्ट

Bank Car Loan Interest: सणासुदीच्या काळात अनेकजण कार घेतात. जर तुम्हीही येत्या काही दिवसात कार घेण्याचा विचार करत असाल तर बँक कार लोनवर किती व्याज आकारते हे जाणून घ्या.
 Car Loan Interest
Car Loan InterestSaam Tv
Published On

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. सणासुदीच्या दिवसात अनेकजण नवीन वस्तू खरेदी करतात. या सणासुदीच्या काळात जर तुम्ही कार घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकेत कमीत कमी व्याजदरात कर्ज मिळेल. आज आम्ही तुम्ही कार लोनवरील व्याजदराची माहिती देणार आहोत. जेणेकरुन कार खरेदी करताना कोणत्या बँकेकडून लोन घ्यावे आणि कोणत्या बँकेच्या लोनवर किती ईएमआय द्यावा लागेल, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 Car Loan Interest
Home Loan : बायकोमुळे करापासून होईल मुक्तता; कर्जाचा हप्ता देखील होईल कमी; जाणून घ्या सविस्तर

कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. कार घेण्यासाठी अनेकजण फार पूर्वीपासून बचत करतात. परंतु अनेकदा बचती केलेले पैसे कार घेण्यासाठी पुरेसे नसतात. त्यामुळे बँकेकडून लोन घ्यावे लागते.चला तर मग जाणून घेऊया कोणती बँक कार लोनवर किती टक्के व्याज लावते.

यूनियन बँक ऑफ इंडिया

यूनियन बँक ऑफ इंडिया ही एक पब्लिक सेक्टर बँक आहे. या बँकेत १० लाख रुपयांच्या कार लोनवर ८.७० टक्के व्याज द्यावे लागेल. म्हणजेच तुम्हाला २४,५६५ रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार लोनवर (SBI Car Loan Interest) ८.७५ टक्के व्याजदर दिले जाते. या व्याजदरानुसार तुम्हाला २४,५८७ रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल. पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेतदेखील ८.७५ टक्के व्याजदर दिले जाते.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियामध्ये कार लोनवर ८.८५ टक्के व्याजदर दिले जाते. या व्याजदरानुसार तुम्हाला महिन्याला २४,६३२ रुपये व्याज द्यावे लागते.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदामध्ये चार वर्षांच्या कालावधीसाठी ८.९० टक्के व्याजदरानुसार लोन दिले जाते. त्यामुळे तुम्हाला ईएमआय २४,६५५ रुपये द्यावा लागेल.

 Car Loan Interest
आकर्षक लूक अन् जबरदस्त फीचर्ससह Tata Curvv EV लाँच ; १० मिनिटांत होणार बॅटरी चार्ज;किंमत किती?

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक ९.१० टक्के व्याजदरावर कार लोन देते. ४ वर्षांच्या कालावधीसाठी हे लोन दिले जाते. यानुसार तुम्हाला २४,७४५ रुपये ईएमआय द्यावा लागणार आहे.

अॅक्सिस बँक

अॅक्सिस बँक ९.३० टक्के व्याजदरानुसार लोन दिले जाते. या व्याजदरानुसार ग्राहकांना २४,८३५ रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.

 Car Loan Interest
फक्त २३५१ रुपये देऊन घरी आणा Honda Activa; जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com