Home Loan : बायकोमुळे करापासून होईल मुक्तता; कर्जाचा हप्ता देखील होईल कमी; जाणून घ्या सविस्तर

Joint Home Loan Benefits : नवऱ्याने पत्नीसोबत संयुक्त गृहकर्ज घेतल्याने अनेक लाभ मिळतील. याद्वारे तुम्ही कमी व्याजदरात गृहकर्ज मिळवू शकता. सविस्तर माहिती वाचा.
Joint Home Loan Benefits
Home LoanSAAM TV
Published On

गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी! गृहकर्जासाठी अर्ज करताना तुमच्या बायकोचाही समावेश करा. तुमच्या बायकोसोबत संयुक्त गृहकर्ज घेतल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

स्वस्तात मस्त गृह कर्ज

  • तुम्ही महिला अर्जदारासोबत संयुक्त गृहकर्ज घेत असाल तर, तुम्हाला थोड्या कमी व्याजदराने कर्ज मिळते.

  • तुम्ही यात आई, पत्नी , बहीण यांसोबत संयुक्त गृहकर्ज घेऊ शकता.

  • तुमच्या पत्नीसोबत संयुक्त कर्ज घेतल्याने तुम्हाला कमी व्याजदराने गृहकर्ज मिळते.

  • कमी व्याजदराने गृहकर्ज मिळाल्यास तुमच्या EMI वर देखील त्याचा परिणाम होतो. तुम्हाला EMI थोडा कमी बसेल.

  • तसेच तुम्ही आयकरात चांगली रक्कम वाचवू शकता, म्हणजेच तुम्हाला थेट दुहेरी लाभ मिळू शकतो.

७ लाख रुपयांपर्यंत कर वाचेल

संयुक्त गृहकर्जामध्ये प्राप्तिकर लाभ मिळतात. संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करून, दोन्ही कर्जदार वेगवेगळे आयकर लाभ घेऊ शकतात. परंतु हा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा अर्जदार दोघेही मालमत्तेचे मालक असतील. तुमच्या पत्नीसोबत संयुक्त गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला दुप्पट कर लाभ मिळेल. मूळ रकमेवर, तुम्ही दोघेही 80C अंतर्गत प्रत्येकी 1.5 लाख रुपये म्हणजेच एकूण 3 लाख रुपयांचा दावा करू शकता. त्याच वेळी, दोघेही कलम 24 अंतर्गत व्याजावर 2 लाख रुपयांचा कर लाभ घेऊ शकतात. अशा प्रकारे पाहिल्यास, तुम्हाला एकूण 7 लाख रुपयांपर्यंतचे कर लाभ मिळू शकतात. तथापि, ते तुमच्या गृहकर्जाच्या रकमेवर देखील अवलंबून असेल.

Joint Home Loan Benefits
Mudra Loan: मुद्रा लोन योजनेच्या नियमात मोठे बदल; आता सहजासहजी नाही मिळणार ‘Mudra Loan’

संयुक्त गृहकर्ज

अनेक लोकांना कमी उत्पन्नामुळे कर्ज घेण्यास अडचणी येतात.अशा परिस्थितीत संयुक्त गृहकर्ज उपयुक्त ठरते. यामध्ये अर्जदार म्हणून तुमच्यासोबत अन्य व्यक्ती जोडून कर्ज घेण्याची पात्रता वाढते.

कर्जाची रक्कम

एकाच कर्ज अर्जदाराला त्याच्या उत्पन्नानुसार कर्ज दिले जाते. पण संयुक्त कर्जामध्ये दोघांचे एकूण उत्पन्न गृहीत धरले जाते. अशा परिस्थितीत कर्जाच्या रकमेची मर्यादा वाढते. परंतु हे लक्षात ठेवा की तुमचे आणि तुमच्या सह-अर्जदाराचे कर्ज ते उत्पन्नाचे प्रमाण 50 ते 60 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

Joint Home Loan Benefits
Post Office Scheme: महिलांसाठी खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् २ वर्षात लखपती व्हा; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com