मुंबई : होंडा अॅक्टिव्हा देशातील सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर आहे. प्रत्येक महिन्यात होंडा अॅक्टिव्हा विक्रीच्या यादीत टॉपमध्ये असते. या अॅक्टिव्हाला ११०सीसी आणि १२५सीसी इंजिन उपलब्ध आहे. डिझाइन, फिचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत ही स्कूटर एकदम भारी आहे. तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, त्याचे तुम्हाला अनेक फायदेही उपलब्ध आहेत. कंपनीने बँक ऑफर ते इएमआयच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
होंडाकडून ऑगस्ट महिन्यात अॅक्टिव्हावर अनेक ऑफर दिल्या आहेत. या ऑफरमध्ये अॅक्टिव्हावर कमीत कमी ७.९९ टक्क्यांनुसार आयडीएफसी बँकेकडून कर्ज उपलब्ध आहे. अवघ्या २३५१ रुपयांच्या इएमआयवर एचडीएफसी बँकेकडून अॅक्टिव्हा घरी आणता येईल. क्रेडिट कार्डवर ५००० रुपयांचं कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. या ऑफरविषयी अधिक माहितीसाठी बँक किंवा शोरुमशी संपर्क साधा.
अॅक्टिव्हा एसटीडी - ७६,२३४ रुपये
अॅक्टिव्हा डीएलएक्स- ७८,७३४ रुपये
अॅक्टिव्हा एच-स्मार्ट - ८२,२३४ रुपये
होंडा अॅक्टिव्हामध्ये ११० सीसी, ४ स्ट्रॉक इंजिन आहे. तर ५.७७ केडब्लूची पॉवर आहे. तर ८.९० एनएम टॉर्क मिळत आहे. यात ऑटोमॅटिक गियरबॉक्स देखील आहे. इंजिनसोबत चांगली पॉवर आणि मायलेज मिळत आहे. एका लीटरमध्ये स्कूटर ५० किलोमीटरपर्यंत मायलेज मिळत आहे. स्कूटरला १२ इंचाचे चाक आहेत. स्कूटरला ५.३ लीटरचं इंधनासाठी टँक दिली आहे. दररोजच्या वापरासाठी चांगली स्कूटर आहे. मात्र, ही स्कूटर महामार्गावर लांबच्या प्रवासासाठी योग्य नाही.
लांबी - १८३३ एमएम
रुंदी - ६९७ एमएम
उंची - ११५६ एमएम
व्हिलबेस - १२६० एमएम
ग्राऊंड क्लीयरेन्स - १६२ एमएम
वजन - १०६ किलो
आता नवीन अॅक्टिव्हा 7G वर काम सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरची टेस्टिंग पूर्ण झाली आहे. कंपनी नवी स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नव्या होंडा अॅक्टिव्हामध्ये अनेक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त एलसीडी मीटर कन्सोल मिळेल. रियल टाइम मायलेजची देखील माहिती मिळेल. हेडलाइटमध्येही नवीन डिझाइन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नव्या अॅक्टिव्हामध्ये इंजिनमध्ये थोडे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.