Evolet Pony Scooter: एक नंबर स्कूटर! एकदा करा फूल चार्ज थेट जाईल ९० किमीच्या पार, बाजारात आली नवी EV Scooter

Evolet Pony Scooter: या स्कूटरचे वजन 76 किलो आहे, ज्यामुळे रस्त्यावर चालवणे सोपे होते. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि अलॉय व्हील्स आहेत.
Evolet Pony Scooter: एक नंबर स्कूटर! एकदा करा फूल चार्ज, थेट जाईल ९० किमीच्या पार; बाजारात आली नवी EV Scooter
Evolet Pony Scooter
Published On

बाजारात एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर आलीय. ही स्कूटर शहरात वापरण्यासाठी उत्तम आहे. स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त मागणी आहे. या सेगमेंटमध्ये कमी स्पीड 250 W बॅटरी असलेल्या स्कूटर आहेत. याच सेगमेंटमध्ये Evolet Pony कंपनीने ही स्कूटर आणलीय.

या स्कूटर चालवण्यासाठी कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाहीये.ही स्कूटर हेल्मेटशिवाय चालवली तरी पोलीस चलन जारी करू शकत नाहीत. किराणा सामान उचलणे, मुलांना शाळेत सोडणे इत्यादी घरातील दैनंदिन कामे करण्यासाठी हे सर्वोत्तम आहेत. इव्होलेट पोनी ही या सेगमेंटची स्कूटर आहे. ही स्कूटर 55,799 रुपयांना उपलब्ध आहे आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 90 किलोमीटरपर्यंत चालते.

Evolet Pony इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी क्षमता 250 डब्ल्यू आहे. या स्कूटरच्या सीटची उंची 800 मिमी आहे, यामुळे कमी उंचीच्या लोकांसाठी देखील स्कूटर चालवणे सोपे होते. मोबाईल चार्ज करण्यासाठी यात USB चार्जिंग पोर्ट देखील असणार आहे. पोनीमध्ये 48 V/24Ah बॅटरी पॅक आहेत. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 90 किमीपर्यंत ही स्कूटर चाललेल असा कंपनीचा दावा आहे. Pony एक हलक्या वजनाची स्कूटर आहे. या स्कूटरचं एकूण वजन 76 किलो आहे, ज्यामुळे रस्त्यावर नियंत्रण करणे सोपे होते. या स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी चार तास लागतात, त्यात फास्ट चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध आहे.

Evolet Pony ची बाजारात PURE EV EPluto 7G स्कूटरशी स्पर्धा आहे. ही स्कूटर 77999 रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही नवीन स्कूटर रस्त्यावर 47 किमी प्रतितास इतका स्पीड देते. तर स्कूटरचं वजन 76 किलो आहे आणि 4 तासात पूर्ण चार्ज होते. स्कूटरमध्ये 1200 W ची हाय पॉवर बॅटरी आहे.

Pony बद्दल खास गोष्टी

परवडणारी किंमत असल्याने ही स्वस्त स्कूटर मध्यमवर्गीयांसाठी सर्वोत्तम आहे.

हलके वजन, ऑपरेट करणे सोपे आहे.

उच्च ड्रायव्हिंग श्रेणी, जी लांब अंतरापर्यंत प्रवास करू शकते.

Evolet Pony Scooter: एक नंबर स्कूटर! एकदा करा फूल चार्ज, थेट जाईल ९० किमीच्या पार; बाजारात आली नवी EV Scooter
60 Kmpl मायलेज अन् 76356 किंमत; जबरदस्त आहे Hero ची ‘ही’ बाईक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com