इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 165km ची जबरदस्त रेंज देणाऱ्या EV वर मिळत आहे 40000 ची सूट

Hero Vida Big Discounts Offer: Hero MotoCorp च्या इलेक्ट्रिक ब्रँड Vida च्या V1 Plus आणि V1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटरवर खूप चांगली ऑफर मिळत आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर कंपनी 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 165km ची जबरदस्त रेंज देणाऱ्या EV वर मिळत आहे 40000 ची सूट
Hero Vida Big Discounts OfferSaam Tv
Published On

जुलै महिन्यात Hero MotoCorp च्या इलेक्ट्रिक ब्रँड Vida च्या V1 Plus आणि V1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटरवर खूप चांगली ऑफर मिळत आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर कंपनी 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या दोन्ही स्कूटरमध्ये 2 Removable बॅटरी आहेत. या दोन्ही स्कूटर्स डिझाइन आणि फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त आहेत.

किंमत आणि ऑफर

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Hero Vida V1 Plus ची किंमत 1,02,700 रुपये आहे. तर Vida V1 Pro ची किंमत 1,30,200 रुपये आहे. या स्कूटरच्या खरेदीवर तुम्हाला या महिन्यात 40,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. तुम्हाला यावर 10,000 रुपयांच्या सबसिडीचाही लाभ मिळेल. या सर्व ऑफर्सच्या माहितीसाठी तुम्हाला हिरो डीलरशीपशी संपर्क साधावा लागेल.

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 165km ची जबरदस्त रेंज देणाऱ्या EV वर मिळत आहे 40000 ची सूट
मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे Maruti Suzuki ची 'ही' 7 सीटर कार, 27km चा देते मायलेज; किंमतही आहे कमी

बॅटरी आणि पॉवर

Hero Vida V1 Plus मध्ये 3.44 kWh ची बॅटरी आहे. याशिवाय, V1 Pro मध्ये 3.94 kWh चा बॅटरी पॅक आहे. दोन्ही प्रकारांमध्ये 6 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. Vida V1 Plus चा टॉप स्पीड 80 kmpl आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 143 किमीची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. ही स्कूटर फक्त 3.4 सेकंदात 0-40km वेग पकडते.

Vida V1 Pro चा टॉप स्पीड 80 kmpl आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 165 किमी रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 165km ची जबरदस्त रेंज देणाऱ्या EV वर मिळत आहे 40000 ची सूट
Tata ची नवीन SUV कार, ऑडी सारखे लक्झरी फीचर्स, किंमत मारुती इतकी; मायलेजही जबरदस्त

फीचर्स

Vida स्कूटरमध्ये बसवलेली बॅटरी काढून ती चार्ज करता येते. तुम्ही घरीही याची बॅटरी चार्ज करू शकता. विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही स्कूटरचा टॉप स्पीड वाढवू शकता आणि जास्तीत जास्त 100 किमी प्रतितास पर्यंत नेऊ शकता. यात 7-इंचाची TFT स्क्रीन आहे, जी स्मार्ट कनेक्ट फीचरसह येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com