मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे Maruti Suzuki ची 'ही' 7 सीटर कार, 27km चा देते मायलेज; किंमतही आहे कमी

Maruti Suzuki Eeco: मारुती सुझुकीची 7 सीटर Eeco कारने विक्रीत (जून 2024) चांगली कामगिरी केली आहे. लोक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कामासाठी ही कार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे Maruti Suzuki ची 'ही' ७ सीटर कार, 27km चा देते मायलेज; किंमतही आहे कमी
Maruti Suzuki EecoSaam Tv
Published On

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कारला भारतात मोठी मागणी आहे. टॉप 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्येही मारुतीचे नाव आघाडीवर आहे. कंपनीच्या 7 सीटर Eeco कारने विक्रीत (जून 2024) चांगली कामगिरी केली आहे. लोक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कामासाठी ही कार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. आज आपण याच कारच्या किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात Eeco (जून-2024) च्या 10,771 युनिट्सची विक्री केली. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 9,345 युनिट्स विक्रीचा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी विक्री चांगली झाली आहे. सतत वाढत्या विक्रीमुळे कंपनी ही कार अपग्रेड करू शकते.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे Maruti Suzuki ची 'ही' ७ सीटर कार, 27km चा देते मायलेज; किंमतही आहे कमी
दिसायला भारी अन् फीचर्सही जबरदस्त, नवीन Hero Xtreme 160R 4V बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत

27km मायलेज

या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, Eeco मध्ये 1.2L पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 80.76 PS ची पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क जनरेट करते. यात पेट्रोल आणि सीएनजी मोड उपलब्ध आहे. ही कार पेट्रोल मोडवर 20 kmpl आणि CNG मोडवर 27km/kg मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे.

Eeco मध्ये बसवलेले हे इंजिन सर्व प्रकारच्या हवामानात चांगली परफॉर्मन्स देते. या कारमध्ये तुम्ही अधिक सामानही नेऊ शकता. जर तुम्ही छोटा व्यवसाय चालवत असाल तर मारुती ईको तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे Maruti Suzuki ची 'ही' ७ सीटर कार, 27km चा देते मायलेज; किंमतही आहे कमी
Maruti Suzuki Alto इलेक्ट्रिक अवतारात येणार? मिळणार हे जबरदस्त फीचर्स

किती आहे किंमत?

सेफ साठी मारुती सुझुकी Eeco मध्ये 2 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, स्लाइडिंग डोअर, चाइल्ड लॉक आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यासारखे फीचर्स आहेत. Eeco मध्ये 13 प्रकार उपलब्ध आहेत, यात 5 सीटर आणि 7 सीटर पर्याय आहेत. दिल्लीत याची एक्स-शोरूम किंमत 5.33 लाख रुपयांपासून सुरू होते. जर तुम्हाला स्वस्त 7 सीटर कार घ्यायची असेल तर तुम्ही Eeco चा विचार करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com