Tecno Pova 6 Pro 5G: 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीवाला नवा स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या सर्व किंमत आणि इतर फीचर्स

Tecno Pova 6 Pro 5G: टेक्नोचा हा हँडसेट कंपनीच्या वेबसाइट, अॅमेझॉन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर 4 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन कॉमेट ग्रीन आणि ग्रे रंगात उपलब्ध करून दिला जाईल.
Tecno Pova 6 Pro 5G
Tecno Pova 6 Pro 5GYandex

Tecno Pova 6 Pro 5G Launched:

भारतात टेक्नोने आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. टेक्नो पोवा 6 Pro 5G कंपनीचा नवा फोन बाजारात लॉन्च केलाय. Mobile World Congress (MWC) 2024 मध्ये कंपनीने या फोनची झलक दाखवली होती. Tecno Pova 6 Pro 5G मध्ये 6000mAh बॅटरी आहे जी 70W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या हँडसेटमध्ये 256 GB पर्यंत स्टोरेज, 12 GB रॅम आणि Android 14 सारखी फिचर्स आहेत. या नवीन Tecno स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्सविषयीची माहिती घेऊ. (Latest News)

Techno Powa 6 Pro 5G च्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर 12GB रॅम असलेल्या आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 21,999 आहे. हे फोन बँक कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 2000 रुपयांची झटपट सूट मिळू शकते. बँकच्या ऑफरनंतर फोनची किंमत अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपये असेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फोनच्या खरेदीवर कंपनीकडून 4,999 रुपयांचा मोफत Tecno S2 स्पीकर देत आहे. टेक्नोचा हा हँडसेट कंपनीच्या वेबसाइट, अमेझॉन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर 4 एप्रिलपासून दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. हा फोन कॉमेट ग्रीन आणि ग्रे रंगात उपलब्ध करून दिला जाईल.

टेक्नो पोवा फोनमध्ये 6 Pro 5G 6.78 HD + AMOLED डिस्प्ले देण्यात आलीय. स्क्रीनचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि ब्राइटनेस पातळी 1300 nits आहे. या हॅण्डसेटमध्ये 6nm mediatek डायमेंशन 6080 प्रोसेसर 12GB पर्यंत रॅम देण्यात आलीय. ही रॅम 12 GB पर्यंत वाढवता येते. 8 GB रॅम पर्यायामध्ये केवळ 8 GB व्हर्च्युअल रॅम उपलब्ध राहील. फोनला पावर देण्यासाठी, 6000mAh बॅटरी प्रदान केलीय. G 70W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट देते.

Tecno Pova 6 Pro 5G हा स्मार्टफोन Android 14 आधारित HiOS 14 सह येतो. या फोनमध्ये डायनॅमिक पोर्ट 2.0 फिचर देण्यात आलंय. ज्यावर चार्जिंग डिटेल्स, नोटिफिकेशन्स आणि कॉल डिटेल्स पाहता येतात. हॅण्डसेटमध्ये अपडेट Arc Interface मध्ये रिअर कॅमेरा युनिट यात 200 पेक्षा जास्त एलईडी देण्यात आलीय. युझर्स विविध सूचना आणि कॉल सिंक करण्यासाठी हे LEDs वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये लाइटअप करण्यात आले आहे. फोनमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टेड ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत.

Tecno Pova 6 Pro 5G
Vivo X Fold 3 भारतात लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com