Vivo X Fold 3 भारतात लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Vivo X Fold 3 Launch in India Soon: चीनी स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच आपला नवीन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 3 सीरीज आपल्या देशांतर्गत बाजारात लॉन्च केली आहे.
Vivo X Fold 3 Launch in India Soon
Vivo X Fold 3 Launch in India SoonSaam Tv

Vivo X Fold 3 Launch in India Soon:

चीनी स्मार्टफोन निर्माता Vivo ने अलीकडेच आपला नवीन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 3 सीरीज आपल्या देशांतर्गत बाजारात लॉन्च केली आहे. ज्या अंतर्गत दोन नवीन हँडसेट Vivo x fold 3 आणि Vivo x fold 3 Pro समाविष्ट आहेत. आता कंपनी भारतात याचे बेस व्हेरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Vivo X Fold 3 मध्ये कंपनी Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि 5,500mAh बॅटरी देत ​​आहे. याच स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vivo X Fold 3 Launch in India Soon
Upcoming Bikes: 125cc सेगमेंटमध्ये बजाज घेऊन येणार जबरदस्त बाईक, लॉन्चआधी फोटो झाला लीक; जाणून संपूर्ण माहिती

एका रिपोर्टनुसार, कंपनी आपला Vivo X Fold 3 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. असं असलं तरी कंपनीने अद्याप याची घोषणा केलेली नाही. या मॉडेलला इंडस्ट्रीतील सर्वात पातळ फोल्डेबल फोन असल्याचा दावा केला जात आहे. हा आगामी फोन फोल्ड केल्यावरही फक्त 10.2 मिमी जाड असेल.   (Latest Marathi News)

Vivo X Fold 3 ची किती असेल किंमत?

कंपनीने Vivo X Fold 3 तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. याच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 6,999 आहे, म्हणजे सुमारे 80,000 रुपये, 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 87,800 रुपये आहे.

Vivo X Fold 3 Launch in India Soon
Mahindra Thar 5 Door या दिवशी होणार लॉन्च, कंपनीने तारीख केली जाहीर

Vivo X Fold 3 ची संभाव्य फीचर्स

हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामुळे भारतीय व्हेरियंटचे फिचर्स कंपनीच्या चायनीज व्हेरियंटसारखेच असू शकतात. हा स्मार्टफोन 8.03-इंच 2K E7 AMOLED मेन डिस्प्ले आणि 6.53-इंच AMOLED कव्हर डिस्प्लेसह येऊ शकतो. ज्यामध्ये अल्ट्रा-थिन ग्लास (UTG) संरक्षण दिले जाऊ शकते. यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS4.0 इनबिल्ट स्टोरेज असेल.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रियर कॅमेरा युनिट असेल. ज्याच्या मुख्य कॅमेरामध्ये 50MP, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 50MP पोर्ट्रेट कॅमेरा असू शकतो. कव्हर आणि मुख्य डिस्प्ले दोन्हीमध्ये 32-मेगापिक्सेलचे दोन सेल्फी कॅमेरे असतील. याला पॉवर करण्यासाठी, कंपनी त्यात 5,500mAh बॅटरी देऊ शकते, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com