मुंबई : iQOO Z9s ने भारतीय बाजारात नवीन दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या कंपनीने भारतात iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro लाँच केले आहेत. या फोनची सुरुवात २० हजार रुपयांनी होते. या फोनमध्ये 6.7-inchचा 120Hz रिफ्रेश रेट 3Dचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळत आहे. या प्रो वर्जनमध्ये ४५०० Nitsची पीक ब्राइटनेस आहे.
या हँडसेटमध्ये कर्व्ड डिस्प्ले मिळत आहे. मोबाईलचा प्रोसेसर देखील दमदार आहे iQOO Z9s या मोबाइलची डिझाइन vivo v40 सारखी आहे. दोन्ही फोनमध्ये एक सारखे फिचर्स आहेत.
प्रो व्हेरिएंटमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेस मिळत आहे. दोन्ही हँडसेटमध्ये Android 14 वर आधारित Funtouch OS 14 मिळतोय. स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि २ एमपीचा सेकेंडरी लेन्स मिळत आहे. प्रो वर्जनमध्ये ५०एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ एमपी सेकेंडरी लेन्स मिळत आहे.
फ्रंट कॅमेरामध्ये १६ एमपी कॅमेरा दिला आहे. तसेच कंपनीने डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. IP64 रेटिंग देखील मिळत आहे. दोन्ही हँडसेटला ५५००mAh बॅटरी देण्यात आली आहे. Z9s मध्ये 44W चार्जिंग मिळत आहे. तर Z9s Pro मध्ये 80Wची चार्जिंग देण्यात आली आहे.
IQoo z9 मध्ये तीन कॉन्फिग्रेशन आहेत. यात ८ जीबी रॅम + १२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१९९९ रुपये आहे. टॉप एन्ड व्हेरिएंटमध्ये १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज कॉन्फिग्रेशनची किंमत २३,९९९ रुपये आहे.
iqoo z9s pro मध्ये तीन कॉन्फिग्रेशन आहेत. ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंत २४,९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २६,९९९ रुपये आहे. १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजची किंमत २८,९९९ रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.