Mobile Addiction : रात्री झोपताना फोन आपल्यापासून किती अंतरावर असावा? वाचा तज्ज्ञांचे मत अन् वेळीच सावध व्हा!

Safe Distance From Smartphone : दुष्परिणाम माहिती असूनही, रात्री झोपताना उशीजवळ फोन ठेवण्याची सवय अनेकांनी अजूनही बदली नाही. जवळ फोन ठेवल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे रात्री झोपताना फोन किती अंतरावर ठेवावा जाणून घ्या.
Safe Distance From Smartphone
Mobile AddictionSAAM TV
Published On

मोबाईल हा जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आता मोबाईल शिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. त्यामुळे लोक वेळ मिळेल तसा मोबाईलचा वापर करतात. आजकाल कामाच्या व्यापामुळे दिवसभर मोबाईल वापरता येत नाही. त्यामुळे बरेच लोक रात्री मोबाईल वापर करतात. बऱ्याच वेळा रात्री फोन वापरताना लोक फोन उशीखाली ठेवून झोपी जातात जे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम दिसून येतात.

झोपताना किती दूर मोबाईल ठेवावा?

तज्ज्ञांचे मते, असंख्य लोक रात्री झोपताना मोबाईल उशी जवळ ठेवून झोपतात. जे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे झोपताना मोबाईल किमान ३-४ फूट दूर ठेवा. मोबाईलमधून घातक रेडिएशन बाहेर येतात. जे आरोग्याला हानी पोहचवतात. त्यामुळे झोपताना फोन दूर ठेवावा. खरंतर आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या रुममध्ये देखील फोन ठेवणे चुकीचे आहे. मोबाईलच्या रेडिएशनमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. यामुळेच फोन उशीखाली ठेवून झोपू नका.

मानसिक ताण

रात्री जास्त काळ मोबाईल वापरल्यामुळे मानसिक ताण वाढतो. रात्री सतत मोबाईल पाहत राहील्यामुळे झोप पूर्ण होत नाही. झोपताना मनाला पूर्ण शांती मिळत नाही. यामुळे आपली चिडचिड होते आणि सकाळी उठल्यावर संपूर्ण दिवस खराब जातो.

Safe Distance From Smartphone
WHO: हेडफोनमुळे 100 कोटी तरुण बहिरे होणार; WHOचा धक्कादायक अहवाल

डोळ्यांचे आरोग्य

रात्री सतत मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, कान दुखणे इत्यादी समस्या उद्भवतात. मोबाईलच्या रेडिएशन डोळ्यांचे आरोग्य बिघडवतात.

फोन वापरताना कोणती काळजी घ्यावी?

  • डोळ्यांच्या जवळ जास्त फोन घेऊन बसू नका.

  • मोबाईलचा ब्राईटनेस कमी ठेवा.

  • रात्री जास्त वेळ मोबाईल पाहत असाल तर झोपण्यापूर्वी डोळ्यांना आराम मिळावा म्हणून आय ड्रॉप घाला. पण यात डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Safe Distance From Smartphone
Social Media Effect On Children : सोशल मीडियाचा वापर करा जरा जपूनच, मुलांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com