ITR Filling 2025 Saam Tv
बिझनेस

ITR Filling 2025: एक फॉर्म भरा अन् TDS रिफंड मिळवा, ITR ची गरज नाही, सरकारचा मोठा निर्णय

TDS Refund Without Filling ITR: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता टीडीएस रिफंडसाठी तुम्हाला आयटीआर भरण्याची गरज भासणार नाही. यासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Siddhi Hande

आता टीडीएस रिफंडसाठी आयटीआर फाइल करण्याची गरज नाही

आयकर विभागाकडे नवीन प्रस्ताव

सरकारने मंजुरी दिल्याचीही माहिती समोर आली आहे.

आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. आता लवकरच करदात्यांना दिलासा मिळणार आहे. आता टीडीएस रिफंड मिळवण्यासाठी आता आयटीआर फाइल करण्याची अट नष्ट होऊ शकते. आता तुम्हाला फक्त एक फॉर्म भरुन टीडीएस रिफंड मिळणार आहे.

आयकर अधिनियमन २०२५ चा आढावा घेणाऱ्या संसदीय समितीने हा प्रस्ताव सुचवला आहे. हा सरकारनेदेखील स्विकारला आहे. मिडिया रिपोर्टनुसार,या समितीने सरकारला शिफारस केली आहे की, अशा करदात्यांना जे कर श्रेणीत येत नाही परंतु त्यांच्याकडून टीडीएस वसूल गेला आहे. त्यांना रिफंडचा दावा करण्यासाठी आयटीआर दाखल करण्यापासून सूट देण्यात यावी. यामुळे या करदात्यांना आयटीआर फाइल करण्याची गरज भासणार नाही.

आता करदात्यांना दिलासा मिळणार आहे. आता फक्त एक साधा फॉर्म भरुन टीडीएस रिफंड मिळण्याची तरतूद असावी, असा शिफारस दिला आहे. जेणेकरुन सहजपणे रिफंड मिळणार आहे.

सरकारने ही शिफारस स्विकारली आहे, असं सांगण्यात येत आहे. जर ही शिफारस स्विकारली तर ही तरतूद आयकर कायदा २०२५ मध्ये सुधारणा म्हणून समाविष्ट केली जाईल. कर मर्यादेपेक्षा कमी असलेल्या नागरिकांना आणि टीडीएस रिफंड दावा करायचा असेल त्यांच्यासाठी आता फॉर्म भरण्याची प्रोसेस अजून सिंपल होणार आहे. हा फॉर्म तयार करण्याची जबाबदारी सीबीडीटीला देण्यात आली आहे.

नवीन प्रणाली कसं काम करणार?

आता टीडीएस रिफंडसाठी आयटीआर फाइल करण्याऐवजी एक साधा फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म २६एएसच्या आधारे तयार केला जाईल. जेणेकरुन करदात्यांना 26AS च्या आधारे नवीन क्लेम फॉर्म भरुन विभागाकडून त्याचा परतावा मिळू शकतो.

नवीन कर प्रणालीनुसार, जर वार्षिक पगार १२.७५ लाख रुपये असेल तर त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. तर त्यांना कर भरावा लागत नाही. अनेकदा ही कागदपत्रे न दिल्यास टीडीएस कापला जातो. त्यामुळे करदात्यांना टीडीएससाठी आयटीआर फाइल करावा लागतो. मात्र, आता आयटीआर दाखल करण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला फक्त एक साधा फॉर्म भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख खून प्रकरणाची १५वी सुनावणी आज होणार

Premature menopause: चाळीशी गाठण्याआधीच महिलांच्या शरीरात अनपेक्षित बदलाने वाढवली चिंता; अकाली रजोनिवृत्तीच्या समस्येत वाढ

Solapur Pune Expressway Closed : सीना नदीच्या प्रवाहात वाढ! सोलापूर- पुणे महामार्ग वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद | VIDEO

iPhone 16 Cancelled: Flipkart Big Billion Daysमध्ये स्कॅम? iPhone 16 ऑर्डर रद्दीमुळे फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजवर ग्राहकांचा संताप

Crime: ४ बहिणींवर बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपीकडून मेहुण्याची हत्या, मृतदेह घराजवळ पुरला

SCROLL FOR NEXT