आर्थिक वर्ष २०२४-२५ लवकरच संपणार आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहे. नवीन आर्थिक वर्षात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला आहे. आता १२ लाखांच्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र, यासाठीही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर या गोष्टी करा. जेणेकरुन तुमचा टॅक्स वाचेल आणि तुम्हाला चांगला रिटर्नदेखील मिळेल.
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS)
तुम्ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाखांपर्यंत टॅक्स सूट मिळते. या योजनेत तुम्ही फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. याचा लॉक इन कालावधी फक्त तीन वर्षांचा आहे.
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)
नॅशनल पेन्शन स्कीम हीदेखील एक उत्तम योजना आहे. या योजनेत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाखांवर सूट मिळते. याचसोबत कलम 80CCD (1B) अंतर्गत ५०,००० रुपयांवर सूट मिळते.
पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF)
पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही सुरक्षित योजना आहे. या योजनेत कलम 80Cअंतर्गत टॅक्स बेनिफीट मिळते. त्यामुळे तुमचा टॅक्स वाचतो.
यूनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लान (ULIP)
तुम्हाला यूनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लानमध्ये खूप फायदा मिळतो. याचा पाच वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. यात प्रीमियमवर टॅक्स सूट मिळते. तसेच मॅच्युरिटीची रक्कम टॅक्स फ्री असते.
टॅक्स सेवर फिक्स्ड डिपॉझिट (FD)
तुम्ही टॅक्स सेवर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करु शकतात. यामध्ये कलम 80Cअंतर्गत १.५० लाखांवर टॅक्सपासून सूट मिळते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही गुंतवणूकीसाठी सुरक्षित योजना आहे. या योजनेत ३० लाखांच्या गुंतवणूकीवर कर सूट मिळते. या योजनेत सर्वाधिक ८.२ टक्के व्याज मिळते.
सुकन्या समृद्धी योजने (SSS)
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी राबवण्यात आली आहे. या योदनेत तुम्हाला १.५ लाखांवर टॅक्स सूट मिळते. तसेच या योजनेतील रिटर्न टॅक्स फ्री असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.