करदात्यांनी आयटीआर भरण्यास सुरुवात केली आहे. आयटीआर भरताना विशेष काळजी घ्यायची असते. तुम्ही तुमच्या उत्पन्नाची खरी माहिती द्यायची असते. अनेकदा करदाते टॅक्स वाचवण्यासाठी खोटी माहिती देतात किंवा अनेकदा उत्पन्नाची माहिती देतच नाही. यामुळे खूप अडचणी येऊ शकतात. परंतु तुमच्या काही उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही.
काही उत्पन्न असे आहेत की जे टॅक्स फ्री असणार आहेत. त्यावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. जाणून घ्या कोणत्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागत नाही.
शेतीतून येणारे उत्पन्न
आयकर कायदा कलम १०(१) अंतर्गत शेतीवर सर्व उत्पन्नावर टॅक्स लागत नाही.
इन्श्युरन्स पॉलिसीमधील पैसे
जीवन विमा पॉलिसीवरील बोनस अकाउंट आणि गोष्टींवर टॅक्स लागत नाही. यासाठी काही अटी आहेत.
पब्लिक प्रोव्हिडंट फंड
पब्लिक प्रोव्हिडंट फंडवरील व्याजदर आणि मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या सर्व अमाउंटवर टॅक्स भरावा लागणार नाहीये. हे उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे.
शिष्यवृत्ती आणि सरकारी पुरस्कार
सरकारी संस्थांमधून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. तसेच भारत रत्न, अर्जुन पुरस्कार किंवा राष्ट्रीय पुरस्कारांमधून मिळणाऱ्या रक्कमेवर टॅक्स भरावा लागणार नाहीये.
नातेवाईकांकडून मिळणारे गिफ्ट
नातेवाईकांकडून कोणत्याही सणासुदीला मिळणारे गिफ्ट हे टॅक्स फ्री असणार आहे. लग्नाच्या वेळी मिळणाऱ्या गिफ्टवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाहीये.
HUF मधून मिळणारी रिसिप्ट
HUF मधून सदस्यांना मिळणारी रक्कम ही टॅक्स फ्री असणार आहे.
सेवानिवृत्तीचा फायदा
ग्रॅच्युटीवर काही लिमिटपर्यंत, हॉलिडे कॅश आणि पेन्शनमध्ये काही कॅटेगरीमध्ये टॅक्स भरावा लागत नाही.
मेडिकल इन्श्युरन्स, ऑफिस अलाउंस
मेडिकल इन्श्युरन्स प्रिमियम, मील कूपन, ऑफिसमधून फोन किंवा इंटरनेट बिलवर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाहीये.
पीपीएफ, एनपीएस, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममधील गुंतवणूकीवर व्याज किंवा मॅच्युरिची अमाउंटवर टॅक्स भरावा लागणार नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.