नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षात नवीन कर प्रणाली लागू केली जाणार आहे. या कर प्रणालीत करदात्यांना दिलासा मिळणार आहे. ही नवीन कर प्रणाली १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आता सर्वसामान्यांना ही नवीन कर प्रणाली अवलंबता येणार आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न हे जूनपासून भरण्यास सुरुवात होईल.या कर प्रणालीत अनेक फायदा होणार आहे. यामध्ये तुम्ही जुनी कर प्रणाली किंवा नवीन कर प्रणालीद्वारे आयकर रिटर्न भरु शकतात. तुमच्या उत्पन्नानुसार इन्कम टॅक्स कापला जातो.
सध्याची कर प्रणाली (Tax Regime)
सध्याच्या कर प्रणालीनुसार, ३ लाख उत्पन्न असल्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. यामध्ये कलम 87A अंतर्गत २५००० रुपयांच्या कर सवलतीनंतर निवासी व्यक्तींना ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. तर नोकरदार व्यक्तींना ७५००० रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन लागू आहे. करदात्यांना १० लाख ते १२ लाखांच्या उत्पन्नावर १५ टक्के टॅक्स भरावा लागतो. १२ ते १५ लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के तर १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यावर ३० टक्के टॅक्स भरावा लागेल.
जुनी कर प्रणाली (Old Tax Regime)
अनेक करदाते अजूनही जुन्या करप्रणालीनुसार इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करु शकतात.यामध्ये ५ लाखांवर करमुक्त आहे. ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर २० टक्के कर भरावा लागतो. तर त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ३० टक्के कर भरावा लागेल.
नवीन प्रस्तावित कर प्रणाली (New Upcoming Tax Regime)
आता लवकरच प्रस्तावित कर प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यामध्ये पगार नसलेल्या व्यक्तींसाठी १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त आहे. यामध्ये कमाल कर सवलत २५००० रुपयांवरुन ६०००० रुपये करण्यात आली आहे. यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन ७५००० रुपये असेल.त्यामुळे १२ लाख ७५००० रुपयांच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
किती उत्पन्नावर किती टॅक्स भरावा लागेल?
उत्पन्न ७.५० लाख
सध्याची कर प्रणाली- ० रुपये कर
जुनी कर प्रणाली- ५४,६०० रुपये कर
नवीन प्रस्तावित कर प्रणाली- ० रुपये कर भरावा लागेल.
उत्पन्न-१३ लाख रुपये
सध्याची कर प्रणाली-८८,४०० रुपये
जुनी कर प्रणाली-१९५०० रुपये कर
नवीन प्रस्तावित कर प्रणाली-२६००० रुपये
१५ लाख रुपये उत्पन्न
सध्याची कर प्रणाली-१,३०,००० रुपये
जुनी कर प्रणाली-२,७५,४०० रुपये
नवीन प्रस्तावित कर प्रणाली ९७,५०० रुपये
उत्पन्न २२.५ लाख रुपये
सध्याची कर प्रणाली-१,३०,००० रुपये कर
जुनी कर प्रणाली-२,७५,४०० रुपये कर
नवीन कर प्रणाली-९७,५०० रुपये कर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.