DA hike Saam tv
बिझनेस

DA hike : वर्षातून २ वेळा DA वाढणार, ६ लाख सरकारी कर्मचार्‍यांना फायदा, या राज्य सरकारचा मोठा निर्णय

Tamil Nadu DA hike twice a year news : स्टॅलिन सरकारने टीएपीएस पेन्शन योजना लागू करत सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा डीए वाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ६ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Namdeo Kumbhar

DA Hike News : तामिळनाडू सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शनिवारी तामिळनाडू अ‍ॅश्युअर्ड पेन्शन स्कीम (टीएपीएस) ची घोषणा केली. ही पेन्शन योजना २००३ मध्ये बंद झालेल्या जुन्या पेन्शन योजनेसारखीच (ओपीएस) फायदे देत आहे. टीएपीएस अंतर्गत तामिळनाडूमधील सरकारी कर्मचाऱ्यांना आता वर्षांतून दोनवेळा डीए मिळणार आहे. सरकारने टीएपीएस लागू केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. त्याशिवाय कुटुंबालाही याचा फायदा होणार आहे.

दोन महिन्यात तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्याआधी स्टॅलन सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. २००३ सारखीच टीएपीएस योजना कर्मचाऱ्यांसाठी लागू केली आहे. गेल्या अनेकवर्षांपासून तामिळनाडूमधील शिक्षक संघटना आणि सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी शनिवारी मान्य झाली. मागली दोन दशकांपासून या टीएपीएससाठी आंदोलन सुरू होते. टीएपीएस योजनेचा फायदा तामिळनाडूमधील सहा लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. पण टीएपीएस लागू करण्यासाठी राज्य सरकारला पेन्शन फंडात १३,००० कोटी रुपये द्यावे लागतील. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अनुषंगाने ही रक्कम दरवर्षी वाढणार आहे.

 तामिळनाडूमधील सरकारी कर्मचाऱ्यांना 'टीएपीएस'चा काय फायदा होणार?

  • तामिळनाडूमधील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना 'टीएपीएस'मुळे निवृत्तीनंतर शेवटच्या बेसिक पगाराच्या ५०% पेन्शन मिळणार आहे.

  • सध्याच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शनवरील महागाई भत्ता (DA) दोनवेळा वाढणार आहे.

  • एखाद्या पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक भार पडला असेल तर पेन्शनच्या ६०% रक्कम त्याच्या/तिच्या नामांकित कुटुंबाला कुटुंब पेन्शन म्हणून दिली जाणार आहे.

  • निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी (समाधान वेतन) देखील मिळणार आहे. त्याची कमाल मर्यादा ₹२५ लाख आहे.

  • पेन्शन मिळविण्यासाठी नियमानुसार सेवा पूर्ण केलेली नसली तरीही त्या कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन मिळेल.

  • सीपीएसमध्ये सामील झाल्यानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अनुकंपा पेन्शन देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT