Success Story saam tv
बिझनेस

Success Story:नोकरीत अपयश, रद्दी पेपरचा ढीग पाहून सुरु केला व्यवसाय; पूनम गुप्ता आज आहेत १००० कोटींच्या कंपनीच्या मालकीण

Siddhi Hande

आयुष्यात कितीही अपयश आले तरीही न डगमगडता उभे राहून आयुष्यात खूप मोठं होता येतं. आयुष्यात जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्यावर यश हे येतंच. असंच यश उद्योगपती पूनम गुप्ता यांनी मिळवले आहे. आयुष्यात अनेक अपयशांना सामोरे गेल्या. चांगली नोकरी मिळाली नाही परंतु त्यांनी आज स्वतः चा आपला बिझनेस उभा केला आहे. या बिझनेसमधून त्या कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. पूनम गुप्ता या रद्दी पेपरवर प्रक्रिया करुन चांगल्या क्वालिटीचा पेपर बनवतात. या पेपरला बाजारात खूप जास्त मागणी आहे. या व्यवसायातून त्या आज कोट्यवधी रुपयांच्या मालकीण आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या यशाची गोष्ट.

भारतीय वंशाच्या पूनम गुप्ता या बिझनेस वुमन आहेत.पूनम या सध्य स्कॉटलँडमध्ये स्थायिक हेत. पूनम मूळच्या दिल्लीच्या होत्या. त्यांनी दिल्लीतील कॉलेमधून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्याचा विचार केला. परंतु नोकरी करताना त्यांना फार काही यश मिळाले नाही. त्यानंतर पूनम यांनी २००२ मध्ये स्कॉटलँडमध्ये राहणाऱ्या पुनीत गुप्तासोबत लग्न केले. लग्नानंतर पूनमदेखील स्कॉटलँडमध्ये स्थायिक झाल्या. त्यांनी तिकडे नोतसी शोधली. मात्र, जास्त अनुभव नसल्याने त्यांना चांगली नोकरी मिळाली नाही. या काळात त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली.

पूनम यांना रद्दी पेपरचा वापर वापर करुन नवीन बिझनेस करण्याची कल्पना सूचली. पूनम या नोकरीसाठी अनेक ऑफिसमध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांना पेपरचे ढीग दिसले. हे ढीग तसेही रद्दीमध्ये जाणार होते. त्यामुळे याचा वापर करुन आपण बिझनेस सुरु करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी संशोधन सुरु केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कल्पनेवर काम केले. त्याचकाळात पूनम यांना स्कॉटलँड सरकारच्या योजनेतून १ लाख रुपयांचा निधी मिळाला.यानंतर त्यांनी शुन्यातून आपला व्यवसाय सुरु केला.

पूनम यांनी २००३ मध्ये पीजी पेपर नावाचा बिझनेस सुरु केला. यात त्यांनी रद्दी पेपर विकत घेतले. त्याचे रुपांतर चांगल्या क्वालिटीच्या पेपरध्ये केले. त्यांची ही कल्पना यशस्वी ठरली. त्यांनी १ लाखांपासून सुरु केलेली ही कंपनी आज १००० कोटींची आहे. (हा आकडा २०२३ जानेवारीचा आहे.)

पूनम यांनी सर्वप्रथम स्थानिक पातळीवर आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या पेपरची स्कॉटलँडमध्ये मागणी वाढू लागली. त्यांनी संपूर्ण स्कॉटलँडमध्ये आपल्या बिझनेसचा विस्तार केला. यानंतर त्यांना जगभरातदेखील आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. आज त्यांच्या पीजी पेपरचा व्यवसाय जगभरात ६० देशांमध्ये पसरलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT