Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आईचं छत्र हरवलं, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC क्रॅक; आधी CA झाली अन् आता होणार IAS

Success Story of UPSC Topper Harshita Goyal: यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. यात हर्षिता गोयल यांनी दुसरी रँक मिळवली आहे. त्यांनी आधी सीएची परीक्षा पास केली होती. त्यानंतर यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

यूपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांना आयएएस (IAS), आयपीएस ऑफिसर व्हायचे असते. नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत हर्षिता गोयल यांनी दुसरी रँक प्राप्त केली. त्यांनी देशसेवा करण्याच्या हेतूने आणि उत्तमरित्या अभ्यास करुन हे यश मिळवले आहे. हर्षिता यांच्या मेहनतीला यश मिळालं.

हर्षिता यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण केले. त्या एक चार्टर्ड अकाउंटट (CA) आहेत.त्यांनी MS यूनिवर्सिटी ऑफ बडौदामधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

हर्षिता यांनी समाजसेवा करण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांना महिसांना सशक्त बनवायचे होते. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. हर्षिता या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सदस्य आहे ज्यांनी यूपीएससी परीक्षा क्लिअर केली. हर्षिता यांच्या आईचे आधीच निधन झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांचा सांभाळ केला. हर्षिता यांच्या वडिलांनी आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांना खूप अभ्यास करण्यासाठी प्रेरणा दिली.

हर्षिता या मूळच्या हरियाणाच्या आहेत. त्या लहानाच्या मोठ्या गुजरातमध्ये झाल्या. त्यांनी बडोदा विद्यापीठातून बी.कॉम पदवी प्राप्त केली. त्यांना लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करायचे होते. त्यांनी महिलांसाठी काम करायचे ठरवले होते.त्यासाठी स्पर्धा परीक्षा हा मार्ग त्यांनी निवडला.

हर्षिता यांनी खूप चांगल्या पद्धतीने जीवनाकडे पाहिले. यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. त्यांना वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. हर्षिता यांनी आपल्या यशामागचे कारणदेखील सांगितले आहे. त्यांनी रोज अभ्यास केला. स्टडी प्लान तयार केला. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे, असं त्यांचे मत आहे.त्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

हर्षिता या शासन आणि सामाजिक कार्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्या गुजरात यूथ पार्लियामेंटचा भाग आहेत. त्यांनी विधी व न्याय विभागात काम केले आहे. याचसोबत त्यांनी एका एनजीओजसाठीदेखील काम केले आहे. हा एनजीओ थैलेसीमिया आणि कॅन्सरच्या (Cancer) रुग्णांसाठी काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

SCROLL FOR NEXT