Surabhi Jayashree Jagdish
अनेकांना प्रश्न असतो की, बायोप्सी केल्याने कॅन्सर शरीरात पसरतो का?
मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा एक गैरसमज असून कॅन्सरचं निदान करण्यासाठी बायोप्सी केली जाते.
बायोप्सीमध्ये शरीरात असलेल्या ट्यूमरचा एक छोटा तुकडा बाहेर काढून त्याची तपासणी केली जाते.
95 % प्रकरणांमध्ये बायोप्सीची गरज असते. ज्यामुळे कॅन्सर आहे की नाही किंवा कोणत्या स्टेजमध्ये आहे ते समजतं.
शिवाय बायोप्सी केल्यानंतर कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरत नाही.
काही कॅन्सरमध्ये बायोप्सीची आवश्यकता नसते. जसं की यकृत किंवा लहान मुलांमधील ट्यूमर.