IPS रतनलाल डांगी यांचा प्रेरणादायी प्रवास
यूपीएससीसाठी ३ सरकारी नोकरी सोडल्या
एका टोमण्याने संपूर्ण आयुष्यचं बदललं
यूपीएससी परीक्षा ही सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दरम्यान, तुमची जर इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर तुम्ही कोणतेही यश सहज मिळवू शकतात. असंच काहीसं रतनलाल डांगी यांच्यासोबत झालं. ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.
एका टोमण्याचे केला निश्चय आणि बनले IPS
रतनलाल डांगी हे मूळचे राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी एकदा त्यांच्या आयपीएस प्रवासाबद्दल व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, त्यांना कोणीतरी टोमणा मारला होता. त्यामुळे त्यांनी जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली.
एका टोमण्याने अख्खं आयुष्यच बदललं
रतनलाल यांनी सांगितले की, १९९६-९७ मध्ये त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. ते चक्कर येऊन पडले होते. तेव्हा एका दुकानदाराने त्याला हॉस्टिपटलमध्ये अॅडमिट केले. दुसऱ्या दिवशी त्यांना जाग आली. तेव्हा तो दुकानदार तिथेच बसलेला होता. तेव्हा त्यांना विचारण्यात आले की, काय झाले तुम्हाला? तेव्हा रतनलाल यांनी सांगितले की, मी अभ्यास करता करता बेशुद्ध पडलो. तेव्हा त्या दुकानदाराने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं की, तुमच्यासारखी लोक कधीच ही परीक्षा पास करु शकत नाही. कशाला स्वतः चा वेळ वाया घालवतो. स्वतः चा चेहरा एकदा आरशात बघ.
दुकानदाराचे हे शब्द रतनलाल यांच्या मनाला लागले. त्यांनी त्यावेळी राजस्थान लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. ते तहसीलदार बनले. त्यानंतर ते पुन्हा त्या दुकानदाराकडे गेले आणि सांगितले की, तुम्ही मला बोलला होता की, मी परीक्षा पास करु शकत नाही. परंतु मी परीक्षा पास केली.
UPSC साठी ३ सरकारी नोकरी सोडल्या
रतनलाल डांगी हे २००३ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससीसाठी तीन सरकारी नोकरी सोडल्या. त्यांनी चौथ्यांदा यूपीएससी परीक्षा पास केली. ते याआधी शिक्षण, टॅक्स इन्स्पेक्टर आणि तहसीलदार म्हणून काम करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.