Mirchi Vada: नाश्त्याला वडापाव कशाला? घरगुती अन् राजस्थान स्टाईल कुरकुरीत मिरची वडा ठरेल बेस्ट ऑप्शन

Sakshi Sunil Jadhav

राजस्थानमधील प्रसिद्ध डीश

राजस्थानातील मरवाड परिसरात मिळणारी स्पायसी मिरची वडा ही तिखट आणि कुरकुरीत स्नॅक्ससाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळा किंवा थंडीत हा वडा अप्रतिम लागतो. आता हा स्वाद आपण घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Rajasthan mirchi vada recipe

कुरकुरीत मिरची वडा रेसिपी

तुम्ही हा वडा घरच्या घरी कुरकुरीत पद्धतीने बनवू शकता. याची पुढे राजस्थान स्टाईल रेसिपी देण्यात आली आहे. यामध्ये लागणारे साहित्यही तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध असेल.

Rajasthan mirchi vada recipe

साहित्य

मोठ्या हिरव्या मिरच्या ६ ते ८, बेसन १ कप, बटाटे उकडलेले २, तेल, लाल तिखट १ चमचा, हिंग, मीठ, हळद पाव टीस्पून, कोथिंबीर, गरम मसाला अर्धा चमचा, आमचूर पावडर किंवा लिंबूाचा रस अर्धा चमचा इ.

Rajasthan mirchi vada recipe

मिरच्या तयार करा

मिरचीमध्ये लांबीने चीर काढा आणि मधल्या बिया थोड्या काढून टाका. त्याने मिरच्याची चव बदलत नाही आणि तेलात बिया उडणारही नाहीत.

Rajasthan mirchi vada recipe

स्टफिंग तयार करा

बटाटे मॅश करून त्यात मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, अमचूर आणि कोथिंबीर मिसळा. पुढे व्यवस्थित स्टफिंग तयार करा.

Rajasthan mirchi vada recipe

मिरचीमध्ये स्टफिंग भरा

प्रत्येक मिरचीमध्ये तयार बटाट्याचे मिश्रण चांगले दाबून भरा. बाहेर येणार नाही याचीही काळजी घ्या.

Rajasthan mirchi vada recipe

बेसनाचे पीठ बनवा

बेसन, हळद, मीठ, हिंग आणि थोडे पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. यामध्ये पाण्याचे प्रमाण तपासणे आवश्यक आहे.

Rajasthan mirchi vada recipe

तेल गरम करा

खोल तव्यावर किंवा कढईत तेल तापवा. तेल तापवताना कढई ओली आहे का तपासा. अन्यथा तेल तुमच्यावर उडू शकतं.

Rajasthan mirchi vada recipe

मिरची पीठात बुडवा

स्टफ्ड मिरची बेसनाच्या मिश्रणात पूर्ण कोट होईपर्यंत फिरवा. गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळल्यानंतर हे वडे स्लाइस करून पुन्हा हलके परत तळले तर अजून क्रिस्पी बनतात. मिरची वडा हिरव्या चटणी आणि चिंचेच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Rajasthan mirchi vada recipe

NEXT: गावरान पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल पिठलं, ज्वारीच्या भाकरीसोबत आखा जेवणाचा बेत

gavran pithla recipe | google
येथे क्लिक करा