Sakshi Sunil Jadhav
थंडीत जेवणाची रंगत वाढवण्यासाठी गावरान स्टाइल पिठलं आजही महाराष्ट्राच्या घराघरात आवडतं. साधं, झटपट आणि तोंडाला पाणी सुटेल अशी ही पारंपरिक रेसिपी अजूनही गावच्या चुलीवर खास बनवली जाते. पुढे आपण याची रेसिपी जाणून घेऊयात.
गावरान पिठल्याची मुख्य खासियत म्हणजे त्याची साधी आणि चटपटीत चव, ज्यात बेसन, हळद, लसूण आणि मिरचीचा परफेक्ट वापर असतो.
लसूण आणि कोरड्या मिरच्या कुटून केलेलं फोडण गावरान पिठल्याला झणझणीत चव देते, हीच त्याची गावाकडची ओळख मानली जाते.
गरम कढईत तेलावर मोहरी, हिंग आणि लसूण फोडणी द्या. ही सुगंधी फोडणीच पिठल्याच्या चवीची खासियत मानली जाते.
बेसन पाण्यात मिसळताना गाठी पडू नयेत म्हणून ते नीट फेटून पातळ करा. यामुळे पिठलं एकदम मऊसूत तयार होतं.
पिठलं सतत ढवळत ठेवल्यास ते क्रीमसारखं टेक्स्चर येतं, जे खास गावरान शैलीचं लक्षण आहे.
शेवटी वरून कोथिंबीर आणि कडाचं तिखट टाकल्याने पिठल्याला रंग आणि चव दोन्ही छान उठून दिसतात.
गरमभाकरी, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरीसोबत हे पिठलं अप्रतिम लागते, गावाकडची पारंपरिक जोडी आजही लोकप्रिय आहे. थंड हवामानात पिठलं शरीराला उब देते आणि पचनासाठी उपयोगी मानले जाते.