बिझनेस

Success Story: १ कोटींची नोकरी सोडली, बिझनेस सुरु केला,पहिल्याच महिन्यात १२ लाखांचे नुकसान, आज १०० कोटींच्या कंपनीचा मालक, वाचा सक्सेस स्टोरी

Success Story Of Unclean Brand: स्वप्न पाहिल्यावर ती पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. किती अपयश आले तरी त्यावर मात करुन जो व्यक्ती प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो.

Siddhi Hande

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. स्वप्ने पाहिल्यावर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केल्यावर तुम्हाला यश हे मिळतेच. असंच यश जमशेदपूरच्या अरुणब सिन्हा यांना मिळाले आहे. अरुनब सिन्हा यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला त्यांना बिझनेसमध्ये खूप अपयश आले. बिझनेसमध्ये तोटा होऊनदेखील पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि आज कोट्यवधींची कंपनी उभारली आहे.

अरुणब सिन्हा यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली. आज अरुणब सिन्हा यांनी आपल्या कंपनीे ९३ शहरांमध्ये स्टोर्स ओपन केले आहे. त्यांनी यूक्लीन नावाची कंपनी सुरु केली. आज ही कंपनी फ्रँचायजी मॉडेलवर काम करते.

पारंपारिक पद्धतीने कपडे धुण्याच्या पद्धतीने नागरिकांना खूप त्रास व्हायचा.त्यामुळे त्यांनीच यूक्लीन नावाची कंपनी सुरु केली. अरुणब यांनी आयआयटीमधून २००८ मध्ये इंजिनियरिंग पूरण केले. इंजिनियरिंगनंनतर त्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी २०११ मध्ये स्टार्टअप सुरु केले. (Success Story)

२०१५ साली त्यांनी स्वतः ची कंपनी विकली. परंतु त्यांना पुन्हा अपयश आले. अपयशानंतर त्यांनी पुन्हा नोकरी केली.त्यांना १ कोटींचे पॅकेज मिळाले होते. परंतु त्यांच्या नशिबात नोकरी करायची नव्हती. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वतः ची कंपनी सुरु केली.

अरुणब यांनी २०१६ मध्ये आपली कोट्यवधि रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडली आणि यूक्लीन नावाची कंपनी सुरु केली. अरुणब हे हॉटेलमध्ये नोकरी करायचे.तेव्हा तिथे कपडे नीट साफ नाही व्हायचे. त्यानंतर त्यांनी बिझनेसची नवीन आयडीया आली.सुरुवातीला फक्त धोबीघाटवर कपडे धुतले जायचे. परंतु यामुळे कपडे स्वच्छ निघायची नाहीत त्याामुळे त्यांनी यूक्लीन नावाच्या कंपनीची सुरुवात केली.

त्यांनी दिल्लीतील एका ड्रायक्लिनिंग स्टोअरचे २ दुकाने स्वतः साठी घेतली. त्यांनंतर २५ लाखांच्या भांडवलासह बिझनेस सुरु केला. त्यांच्या या दुकानाला एक दिवस आग लागली. या आगीत १२ लाख रुपये जळून खाक झाले. त्यांचे खूप मोठे नुकसान झाले. तरीही त्यांनी हार मानली नाही. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. (Success Story Of Unclean Brand)

अरुणब यांनी यूक्लीन कंपनीचे फ्रँचायझी मॉडेल सुरु केली. आज या कंपनीत प्रति किलो कपडे धुण्यासाठी ८०-१८० रुपये पैसे द्यावे लागतात. तसेच २००० रुपयेदेखील ड्रायक्लीनसाठी खर्च केले जातात. आज या कंपनीची ९३ शहरांमध्ये ३२३ दुकाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT