Success Story : भांडी घासण्यापासून ते वेटरपर्यंतचं काम केलं, आज उभारली कोट्यवधींची कंपनी; 'भास्कर पुरणपोळी घर'ची सक्सेस स्टोरी वाचा

Bhaskar Puranpoli Ghar Success Story: स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केल्यावर ती नक्कीच पूर्ण होतात. असंच स्वप्न केआर भास्कर यांचेही पूर्ण झाले आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

स्वप्न बघितल्यावर ती नक्कीच पूर्ण होतात, असं कोणीतरी म्हटलं आहे. स्वप्न बघितल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी मेहनत केल्यावर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. असंच यश कर्नाटकमधील केआर भास्कर यांना मिळालं. केआर भास्कर यांनी भास्कर पुरणपोळी घर या बिझनेसची सुरुवात केली.

केआर भास्कर हे मूळचे कर्नाटकचे रहिवासी. त्यांनी शार्क टँक इंडियामध्येदेखील सहभाग घेतला आहे. केआर भास्कर यांनी एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी आज कोट्यवधींची कंपनी सुरु केली आहे. भास्कर यांची कर्नाटक आणि महाराष्ट्रमध्ये फूड चेन आहे. (Success Story)

Success Story
Success Story : वय नावाला असते! बँकेतील नोकरी सोडली अन् ५० व्या वर्षी व्यावसाय उभारला, NYKAA च्या फाल्गुनी नायर यांची यशोगाथा वाचाच

केआर भास्कर यांनी 'भास्कर का पुरणपोळी घर' या नावाने ब्रँड सुरु केली. पुरणपोळी आणि स्नॅक्स विकून ते दर महिन्याला लाखो रुपये कमावतात. त्यांचे आउटलेट्स कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या कंपनीचा वार्षिक नफा ३.६ कोटी रुपये आहे. त्यांनी स्वतः च्या मेहनतीवर शुन्यातून विश्व निर्माण केलं आहे.

भास्कर यांनी एक मुलाखतीत सांगितले होते की,२५ वर्षांपूर्वी त्यांनी बंगळुरु येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणे होते. त्यावेळी त्यांचे वय १२ होते. ते त्यावेळी हॉटेलमध्ये टेबल, भांडी साफ करायचे. त्यानंतर ते २३ वर्षाचे असताना सायकलीवरुन पुरणपोळी विकायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतः चा बिझनेस सुरु केला. (Success Story Of Puranpoli Ghar)

Success Story
Success Story: पोलिओ झाला, वडिलांचं छत्र हरपलं, खडतर परिस्थितीत IAS झाला, सोलापूरच्या सुपुत्राची यशोगाथा वाचा

केआर भास्कर यांचे एका कुकिंग शोमध्ये सिलेक्शन झाले होते. त्यानंतर ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी कर्नाटकमध्ये १७ दुकाने आणि १० पेक्षा जास्त फ्रँचायसी सुरु केली. भास्कर यांच्या पुरणपोळी घरात रोज १००० पेक्षा जास्त पुरणपोळी विकल्या जातात.

Success Story
Success Story: २०० रूपयांपासून बिझनेसला केलेली सुरुवात, आज १० कोटींच्या कंपनीचा मालक, पाहा २२ वर्षीय मुलाची यशोगाथा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com