Success Story: २०० रूपयांपासून बिझनेसला केलेली सुरुवात, आज १० कोटींच्या कंपनीचा मालक, पाहा २२ वर्षीय मुलाची यशोगाथा

Success Story: कोणत्याही वयात आणि कमीत कमी पैशात व्यवसाय करू शकता हे दाखवून दिलंय तामिळनाडूच्या सूर्यवर्शनने. सूर्यवर्शनने अवघ्या 200 रुपयांपासून त्याच्या बिझनेसला सुरुवात केली होती.
Success Story
Success Storysaam tv
Published On

आपल्या मनातही नोकरी सोडून एखादा बिझनेस करण्याचा विचार येतो. कदाचित एखाद्या वेळी कामाचा कंटाळा येऊन तुम्हाला देखील व्यवसाय करावा असं वाटलं असेल. मात्र काही जण पैसे आणि वय याचा एकंदरीत विचार करून व्यवसाय करण्याचं स्वप्न पूर्ण करत नाहीत. मात्र तुम्ही कोणत्याही वयात आणि कमीत कमी पैशात व्यवसाय करू शकता हे दाखवून दिलंय तामिळनाडूच्या सूर्यवर्शनने. पाहूयात सुर्यवर्शनची यशोगाधा...

सर्वप्रथम सूर्यवर्शनने अवघ्या 200 रुपयांपासून त्याच्या बिझनेसला सुरुवात केली होती. आणि आता त्याचे हे वेंचर तब्बल 10 कोटी रुपयांचा झालाय. वयाच्या 22 व्या वर्षी कर्तृत्वाच्या या उंचीवर पोहोचवणं सूर्यसाठी काही सोपं नव्हतं. यासाठी त्याने दिवसरात्र अतोनात मेहनत घेतली आहे.

Success Story
Success Story: अवघ्या २००० रूपयांची गुंतवणूक करून सुरु केला वेगळा बिझनेस; आज कमावतात लाखोंनी पैसा

तामिळनाडूतील मदुराईमध्ये राहणाऱ्या सूर्यने त्यांची कंपनी 'नेकेड नेचर' ही D2C (डायरेक्ट टू कस्टमर) कंपनी सुरू केली आहे. मुख्य म्हणजे सूर्यने त्याच्या पालकांकडून मिळालेला पॉकेट मनी वाचवला आणि त्याचं पहिले प्रोडक्ट तयार केलं. या प्रोडक्टला त्याने त्याने हिबिस्कस बाथ सॉल्ट असं नाव दिलं होतं. हा व्यवसाय 10 कोटी रुपयांपर्यंत त्याने कसा पोहोचला ते पाहूयात.

अवघ्या २०० रूपयांमध्ये सुरु केला होता बिझनेस

22 वर्षीय सूर्यवर्धनने केवळ 200 रुपयांमध्ये त्याच्या बिझनेसमधील पहिलं प्रोडक्ट तयार केलं होतं. त्याचं पहिलं प्रोडक्ट हिबिस्कस बाथ सॉल्ट त्याने 12 वीत असताना तयार केलं होतं. हे उत्पादन सूरयाच्या स्वयंपाकघरात तयार करण्यात आलेलं. यामध्ये त्याने हिबिस्कसची फुलं आणि मीठ वापरलं होतं. इतक्या लहान वयात सूर्यच्या मोठ्या स्वप्नांना फारशी साथ मिळाली नाही, मात्र असं असलं तरीही त्याने हार मानली नाही.

यानंतर सूर्याने चेन्नईमध्ये त्याचं पुढचं शिक्षण सुरु ठेवत आठवड्याच्या शेवटी बिझनेससाठी वेळ काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी तो चेन्नई ते मदुराई असा प्रवास करत होता.

सूर्यासाठी एक खास दिवस आला जेव्हा एका आयुर्वेदिक डॉक्टरने त्याचं पहिलं बाथ सॉल्ट विकत घेतलं. यामुळे सूर्याला एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला. यानंतर सूर्यने दुरईतील महाविद्यालयातून डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण घेतलं. आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सूर्यने डिजिटल मार्केटिंगचे क्लासेस घेण्यास सुरुवात केली आणि त्याद्वारे 2.20 लाख रुपये कमावले. याच कमावलेल्या पैशांमधून सूर्यने त्याची कंपनी नेकेड नेचर सुरू केली.

Success Story
Success Story: 8 हजारांच्या कर्जात सुरू केला बिझनेस, आज आहेत 800 कोटींच्या मालकीण, कोण आहेत मीना बिंद्रा?

कशी झाली कंपनीची सुरुवात?

नेकेड नेचरमध्ये डिजिटल मार्केटमधून पुन्हा गुंतवणूक केल्यानंतर, सूर्यने त्याच्या प्रोडक्टची संख्या वाढवली. यामध्ये त्वचा आणि केसांशी संबंधित 70 प्रोडक्ट लाँच करण्यात आले. यानंतर ब्रँडचा झपाट्याने विस्तार झाला आणि 2021-22 मध्ये 56 लाख रुपयांची कमाई झाली.

नेक्ड नेचरचे मुख्य युनिट मदुराईमध्ये आहे. याचे प्रोडक्ट्स तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात ऑनलाइन उपलब्ध आहेत. आता या कंपनीचा 10 कोटींचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे अवघ्या २२ व्या वर्षी २०० रूपयांपासून सुरु केलेल्या बिझनेसला यशस्वीरित्या कोटींच्या घरात पोहोचवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com