नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत विविध पदांसाठी भरत जाहीर करण्यात आली आहे.तरुणांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ईपीएफओमधील या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
EPFO मध्ये यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.या नोकरीसाठी तुम्ही epfindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करा. (EPFO Job)
ईपीएफओमधील या नोकरीसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असावी.
ईपीएफओमधील यंग प्रोफेशनल्स या पदासाठी उमेदवारांना ६५,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती दिल्ली येथे केली जाईल.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना अर्जासह कागदपत्रेदेखील सादर करायची आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिसूचनेमधील अर्ज डाउनलोड करावा लागणार आहे.त्यानंतर तो अर्ज भरुन rpfc.exam@epfindia.gov.in या ईमेलवर पाठवावा लागणार आहे. (EPFO Recruitment)
सध्या कर्मचारी राज्य विमा निगममध्येही नोकरी करण्याची संधी आहे. २२ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. सिनियर रेसिडेंट असं या पदाचे नाव आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना ६७,७०० के १,६३,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.