Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Success Story Of Sudheer Koneru: प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही वेळ नसते हे सुधीर कोनेरु यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी स्वतः ची कंपनी उभारली आहे.

Siddhi Hande

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. परंतु अनेकदा आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आपले स्वप्नांकडे दुर्लक्ष होतं. परंतु कितीही मोठे झालो तरीही ते स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आपल्या मनात असते. असंच काहीसं सुधीर कोनेरु यांच्यासोबत झालं. (Success Story)

सुधीर कोनेरु हे नोकरी करत होते. त्यांच्याकडे चांगल्या पगाराची नोकरी होती. तरीही त्यांनी ४० व्या वर्षी नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक अडचणींवर मात करत आज स्वतः ची कंपनी उभारली आहे. सुधीर हे जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीत मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत होते. त्यांनी २००८ साली नोकरी सोडली.

सुधीर यांनी आयआयटी मद्रासमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवली. यानंतर त्यांनी अमेरिकेतील टेक्सास कंपनीत पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी केली. (Sudheer Koneru Success Story)

सुधीर यांनी आतापर्यंत तीन कंपन्या स्थापन केल्या. त्यापैकी दोन कंपन्या त्यांनी विकल्या. मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी intelliPrep Technologis ही कंपनी उभारली. ते काही काळ कंपनीचे सीईओ होते. त्यानंतर कंपनी Click2learn मध्ये विलीन झाली. यानंतर त्यांनी समटोटल नावाने कंपनी उभारली. या काळात ते नोकरी करत होते. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांच्या गॅपनंतर त्यांनी नवीन व्यवसाय सुरु केला.

वेलनेस, स्पा आणि सलूनचे मार्केट लक्षात घेऊन त्यांनी ManageMySpa नावाचे सॉफ्टवेअर तयार केले. २०१५ मध्ये कंपनीचे नाव झेनोटी ठेवण्यात आले. या कंपनीची वॅल्यू १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. ५० हून अधिक देशांमध्ये हे सॉफ्टवेअर वापरले जाते. या कंपनीची वॅल्यू १२,००० कोटी रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

SCROLL FOR NEXT