Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ५ वी नापास, १२ रुपये घराबाहेर पडला, आता कोट्यवधींची कंपनीचा मालक; 'डायमंड किंग' कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून देतात मर्सिडीज

Success Story Of Savjibhai Dholakia: १२ रुपये घेऊन घराबाहेर पडले अन् स्वतः चा व्यवसाय सुरु केला. सावजीभाई ढोलकिया यांना आज डायमंड किंग म्हणून ओळखले जाते.

Siddhi Hande

जो व्यक्ती शून्यातून आपलं विश्व निर्माण करतो, बिझनेस उभा करतो तो पुढे यशस्वी होतो. बिझनेस सुरु करताना सुरुवातीला अनेकजणांकडे काहीच नसते.भांडवल नसते, त्याचसोबत इतर लोकांचा विश्वास नसतो. अशा परिस्थितीतदेखील जो व्यक्ती स्वतः ला सिद्ध करतो तो व्यक्ती यशस्वी होतो. असंच यश सावजीभाई ढोलकिया यांना मिळवलं आहे.

सावजीभाई ढोलकिया हे पाचवी फेल आहेत. पाचवीत नापास झालेले असतानाही त्यांनी आज कोट्यवधींचं साम्राज्य निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या कामाचे श्रेय नेहमी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्याचसोबत ते नेहमी कर्मचाऱ्यांना चांगला बोनस देत असतात. (Savjibhai Dholakia Success Story)

सावजीभाई हे मूळचे गुजरातच्या डुढाला गावचे रहिवासी. त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर फक्त १२.५ रुपये घेऊन त्यांनी घर सोडले. ते सूरतमध्ये गेले.त्यांचे हे पैसे फक्त सुरतला जाताना बसच्या खर्चासाठीच गेले. सावजीभाई यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले. आज त्यांची संपत्ती १.५ बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे.

सावजीभाई यांनी सूरतमध्ये जाऊन डायमंडचा व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय कोट्यवधींच्या घरात आहे. सावजीभाई यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी आपल्या यशाचं श्रेय आपल्या कर्मचाऱ्यांना देतात. ते कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून कार, घर गिफ्ट देतात. एकदा तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मर्सिडीज भेट म्हणून दिली होती.

१३ व्या वर्षी शिक्षण सोडून सावजीभाई यांनी सूरत गाठले. सुरतला ते आपल्या काकांच्या घरी राहिले. त्यांचे काका हे हिऱ्याचे व्यापारी होते. तिथेच त्यांनी डायमंड ट्रेडिंगबाबत सर्व माहिती मिळवली. सूरतच्या एका फॅक्टरीमध्ये १७९ रुपये महिना या पगारावर नोकरी केली. त्यातील १४० रुपये खाण्या-पिण्यात खर्च झाले. त्यानंतर त्यांच्याकडे फक्त ३९ रुपये असायचे. त्यांनी जवळपास १० वर्ष हिरा घासायचे काम केले. त्यानंतर त्यांनी भाऊ हिम्मत आणि तुलसी यांच्यासोबत कृष्णा एक्सपोर्ट्स नावाची कंपनी सुरु केली. (Savjibhai Dholakia Diamond King Success Story)

कृष्णा एक्सपोर्ट्स ही कंपनी डायमंड आणि टेक्सटाइल सेगमेंटमध्ये काम करते. त्यांच्याकडे जवळपास ६००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. सावजीभाई यांच्या या कंपनीची किंमती कोट्यवधींच्या घरात आहे. त्यांनी एकदा आपल्या कंपनीच्या ज्या मॅनेजरला २५ वर्ष पूर्ण झाले आबे त्यांना मर्सिडीज कार दिली होती. त्यांच्या या स्वभावाची नेहमी सर्वत्र चर्चा असते. (Success Story)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: येवला मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदेंना उमेदवारी

Arjun Kapoor: दमदार अभिनय अन् हटके स्टाइल स्टार अर्जुन आहे धनाढ्य, संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क

NCP 2nd Candidate List : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; छगन भुजबळ यांच्या विरोधात दिला तगडा उमेदवार, वाचा संपूर्ण यादी

नुसरतचे 'हे' हटके ब्लाउज पाहिलेत का?

Mumbai Accident : ड्युटी संपवून घरी जात होते आजोबा; पाठीमागून स्कूल बस आली अन्...

SCROLL FOR NEXT