Success Story: घरी जाऊन पेन विकायचा, एका आयडिने जग बदलले, २३०० कोटींच्या कंपनीचा मालक, वाचा इन्व्हर्टर मॅनची यशोगाथा

Kunwer Sachdeva Success Story: आयुष्यात जो व्यक्ती सर्वात जास्त मेहनत करतो तोच यशस्वी होतो. असंच यश कुंवर सचदेव यांनी मिळवलं आहे. त्यांना आज इन्व्हर्टर मॅन म्हणून ओळखले जाते.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात कितीही अपयश आले किंवा कठीण प्रसंग आले तरीही त्याचा सामना जो व्यक्ती करतो, तोच आयुष्यात खूप यशस्वी होतो. मेहनत आणि प्रयत्न केल्यावर तुम्हाला यश हे मिळतेच. जर तुम्ही घाबरलात तर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करुन त्यावर मात करण्याची जिद्द तुमच्याकडे असायला हवी. अशीच जिद्द आणि मेहनत कुंवर सचदेव यांनी केली. आज ते कोट्यवधींचे मालक आहे.

कुंवर सचदेव यांना इनवर्टर मॅन म्हणून ओळखले जाते. त्यांनी Su-Kam नावाची कंपनी सुरु केली. ही कंपनी सोलर प्रोडक्ट्स विकते. या प्रोडक्ट्सची मागणी फक्त भारतात नव्हे तर जगभरात आहे. (Su-Kam Company Success Story)

Success Story
Success Story: CAT परीक्षेत ९९ टक्के, लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडली, जिद्दीवर IAS झाली; महाराष्ट्राच्या लेकीची यशोगाथा वाचा...

कुंवर सचदेव यांचे वडील रेल्वेमध्ये क्लर्क होते. त्यांनी आपले शिक्षण सरकारी शाळेत केले. कुंवर यांना डॉक्टर बनायचे होते. मात्र, मेडिकलची परीक्षा पास न झाल्याने त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. त्यांनी आपल्या शिक्षण खर्च स्वतः करण्यासाठी घरोघरी जाऊन पेन विकले होते.

कुंवर यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केबल कम्युनिकेशन कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात नोकरी केली.याचवेळी त्यांनी समजले की, केबलचा बिझनेस हा खूप फायद्याचा आहे. त्यावेळीच त्यांनी नोकरी सोडून बिझनेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सु-काम कम्युनिकेशन सिस्टीम नावाने व्यवसाय सुरु केला. (Kunwer Sachdeva Success Story)

Success Story
Success Story: अवघ्या २००० रूपयांची गुंतवणूक करून सुरु केला वेगळा बिझनेस; आज कमावतात लाखोंनी पैसा

कुंवर सचदेव यांच्या घरात एक इनव्हर्टर होता. तो नेहमी खराब व्हायचा. एके दिवशी त्यांनी तो इन्व्हर्टर खोलून तो चेक करायचा प्रयत्न केला. परंतु त्यातील सामान हे खराब असल्याचे त्यांनी समजले. त्यानंतर त्यांनी इनव्हर्टर बनवायला सुरुवात केली. ही कंपनी आज अनेक सोलर प्रोडक्ट्स बनवते.

कुंवर सचदेव यांची कंपनी २३०० कोटींची आहे. या कंपनीचे सोलर प्रोडक्ट्स दिवसाला १० तासांची वीज देऊ शकतात. आतापर्यंत भारतातील एक लाखांपेक्षा जास्त घरात कंपनीचे सोलर प्रोडक्ट्स लावण्यात आले आहेत. (Success Story)

Success Story
Success Story: परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडली, UPSC परीक्षा दिली अन् IAS झाली; महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या प्रियंवदा यांची यशोगाथा वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com