Diamond League: गोल्डन बॉय Neeraj Chopraचं 'डायमंड' थोडक्यात हुकलं! 0.001 सेंटीमीटरने बिघडवला खेळ -VIDEO

Neeraj Chopra, Diamond League: डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राला जेतेपदाची सुवर्णसंधी होती. मात्र ही संधी थोडक्यात हुकली आहे.
Diamond League: गोल्डन बॉय Neeraj Chopraचं 'डायमंड' थोडक्यात हुकलं! 0.001 सेंटीमीटरने बिघडवला खेळ -VIDEO
neeraj chopratwitter
Published On

पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घालणारा नीरज चोप्राने आणखी एका स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. ब्रुसेल्समध्ये डायमंड लीग स्पर्धेची फायनल पार पडली. या स्पर्धेतील भालाफेक क्रीडा प्रकारात नीरज चोप्राने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अवघ्या ००.१ मीटरने त्याचं जेतेपद हुकलं आहे. दरम्यान अँडरसन पीटरने बाजी करत जेतेपदाचा मान मिळवला आहे.

फायनलमध्ये ग्रेनेडाचा पीटर अँडरसन आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि नीरज चोप्रा यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या प्रयत्नात अँडरसनने ८७.८७ मीटर लांब थ्रो केला. तर वेबरने ८५.९७ मीटर लांब थ्रो केला. त्यानंतर नीरजने (Neeraj Chopra) ८६.८२ मीटर लांब थ्रो करत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ८३.६९ मीटर लांब थ्रो करता आला. तर अँडरसनने ८६.९६ आणि वेबरने ८२.६१ मीटर लांब थ्रो केला.

नीरजला अजूनही अव्वल स्थानी जाण्याची संधी होती. मात्र त्याला अँडरसन पीटरपेक्षा लांब थ्रो करता आला नाही. चौथ्या प्रयत्नात त्याने ८२.०४ मीटर लांब थ्रो केला. उर्वरित २ थ्रो मध्ये त्याने अँडरसन पीटरला मागे टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र हे शक्य होऊ शकलं नाही. नीरजचा पहिला क्रमांक अवघ्या ००.१ मीटरने हुकलं.

Diamond League: गोल्डन बॉय Neeraj Chopraचं 'डायमंड' थोडक्यात हुकलं! 0.001 सेंटीमीटरने बिघडवला खेळ -VIDEO
Neeraj Chopra: नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू ३३० कोटींच्या घरात! हार्दिक पंड्यालाही सोडणार मागे

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक

ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत ट्रॅक अँड फील्ड प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती.

मात्र त्याला सुवर्णपदक पटकावता आलं नाही. त्याने ८९.४५ मीटर लांब थ्रो करत इतिहासाला गवसणी घातली. यासह थ्रो सह त्याने आपलं रौप्यपदक निश्चित केलं. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर लांब थ्रो करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. दरम्यान नीरजने बॅक टू बॅक स्पर्धेत पदक जिंकत इतिहास रचला.

विजेत्यांवर पैशांचा पाऊस

ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला २५,१८,२३५ रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. तर तर उपविजेत्या खेळाडूला १०,०७,०४२ रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी ८३,९३५ रुपये दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com