Success Story saam tv
बिझनेस

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

Success Story: गोरखपूरच्या संगीता पांडे. संगीता यांनी त्यांच्या बिझनेसद्वारे केवळ त्यांच्या कुटुंबाला मदत केली नाही तर समाजातील अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलीये.

Surabhi Jayashree Jagdish

जर तुमच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे आपण बिझनेस करण्यासाठी धजावत नाही. तुम्हीही याच कारणाने बिझनेस करण्यास घाबरत असाल तर आज आम्ही तु्म्हाला एका सुपरवुमनची गोष्ट सांगणार आहोत. त्यांनी अवघ्या १५०० रूपयांपासून त्यांच्या बिझनेसला सुरुवात केली होती, आता त्यांची कंपनी ३ कोटींची आहे.

या सुपरवुमन आहेत गोरखपूरच्या संगीता पांडे. संगीता यांनी त्यांच्या बिझनेसद्वारे केवळ त्यांच्या कुटुंबाला मदत केली नाही तर समाजातील अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलीये. जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा.

संगीता यांच्या आयुष्यात अनेक संघर्ष होते. तब्बल १० वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, तेव्हा त्यांनी असं काहीतरी करण्याचा विचार केला ज्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. गोरखपूर विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या लहान मुलाची काळजी घेताना ती नोकरी करणं संगीता यांना शक्य झालं नाही. शेवटी त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

१५०० रूपयांपासून सुरु केला मिठाईचा डबा

यानंतर संगीता यांनी मिठाईचा बॉक्स तयार करण्यास सुरुवात केली . घरात पडून असलेली जुनी सायकल वापरून तिने बाजारात जाऊन १५०० रुपयांचा कच्चा माल आणला. पहिल्या दिवशी त्यांनी 100 बॉक्स तयार केले. यानंतर त्या बाजारात विकण्यास गेल्या. सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही. काही काळानंतर, त्यांनी लखनऊवरून स्वस्त कच्चा माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू मार्केटिंगच्या महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या.

दागिने गहाण ठेवले

संगीता यांच्यावर एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्यांना त्यांचे दागिने गहाण ठेवावे लागले होते. लखनऊ आणि दिल्लीतून कच्चा माल आणून त्यांनी आपल्या प्रोडक्टचा दर्जा सुधारला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढू लागला आणि 35 लाखांचे कर्ज घेऊन त्यांनी कारखाना सुरू केला. आज संगीता यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत ज्यातून त्या पुरवठा करतात.

सध्या संगीता यांची कंपनी मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करते. सध्या त्यांच्या कंपनीचं उत्पन्न ३ कोटींच्या घरात आहे. याशिवाय त्या या कामातून इतर महिलांना रोजगार देखील देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT