आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते. आयुष्यात कितीही मोठे झालो तरीही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी मेहनत घ्यायची असते. कितीही यशस्वी झालो तरीही अनेकांना ते स्वप्न पूर्ण न झाल्याची खंत मनात असते.परंतु हे स्वप्न तुम्ही कोणत्याही वयात पूर्ण करु शकतात.असंच काहीसं रोमन सैनी यांच्यासोबत झालं. (Roman Saini Success Story)
रोमन सैनी हे अनअकॅडमीचे संस्थापक आहेत. अनअकॅडमी ही एड्युटेक कंपनी आहे.त्यांनी MBBS केले त्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली. यानंतर स्वतः ची कंपनी सुरु केली.
MBBS पदवी मिळवली (MBBS-UPSC-Businessman)
रोमन यांचा प्रवास डॉक्टर,IAS ऑफिसर ते बिझनेसमॅन असा आहे. रोमन हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांनी १६ व्या वर्षी AIIMS ची प्रवेश परीक्षा पास केली. २१ व्या वर्षी त्यांनी MBBS पदवी प्राप्त केली.
UPSC परीक्षा दिली
रोमन यांनी एमबीबीएसचे(MBBS) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा यूपीएससीची तयारी केली. त्यांनी २२ व्या वर्षी यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली आणि IAS ऑफिसर बनले.
सुरु केला व्यवसाय (UNACADEMY Owner success Story)
रोमन यांना आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं. त्यामुळे त्यांनी IAS ची नोकरी सोडली. त्यांनंतर २०२५ साली त्यांनी गौरव मुंजाल आणि हेमेश सिंह यांच्यासोबत अनअकॅडमीची स्थापना केली. अनअकॅडमी हा मोठा एड्युटेक प्लॅटफॉर्म आहे. या कंपनीची किंमत २६,००० कोटी रुपये आहे.या अॅपवरुन वेगवेगळे विषय शिकवले जातात. कमीत कमी खर्चात खूप चांगले शिक्षण दिले जाते. मिडिया रिपोर्टनुसार, त्यांची सॅलरी ८८ लाख रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.