Surabhi Jayashree Jagdish
डाळ फक्त चविष्टच नाही, तर शरीरासाठी प्रोटीनचा महत्त्वाचा स्रोत मानली जाते. शाकाहारी लोकांसाठी ती पोषणाचा उत्तम पर्याय आहे. दररोज डाळ खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.
प्रत्येक प्रकारच्या डाळीत प्रोटीनचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येक डाळीचे पोषण मूल्यही वेगळं असते. योग्य डाळ निवडून आहार अधिक संतुलित करता येतो.
साधारणपणे एका वाटी शिजवलेल्या दाळीत 8 ते 12 ग्रॅम प्रोटीन असतं. हे प्रमाण दाळीच्या प्रकारानुसार बदलतं. त्यामुळे विविध डाळींचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.
एका वाटी उकडलेल्या पिवळ्या मूग डाळीत सुमारे 9 ग्रॅम प्रोटीन मिळते. ही डाळ पचायला हलकी असते. त्यामुळे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी योग्य मानली जाते.
एका वाटी लाल मसूर डाळीत सुमारे 18 ग्रॅमपर्यंत प्रोटीन आढळते. त्यामुळे ती शाकाहारींसाठी उत्कृष्ट प्रोटीन स्रोत ठरते. स्नायूंच्या वाढीसाठीही तिचा फायदा होतो.
भारतीय घरांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या तूर डाळीत 9 ते 11 ग्रॅम प्रोटीन असतं. ही डाळ दैनंदिन जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. तिच्या सेवनाने शरीराला चांगलं पोषण मिळतं.
फायबर आणि प्रोटीनने समृद्ध चणा डाळीत 10 ते 12 ग्रॅम प्रोटीन मिळतं. ती पोट दीर्घकाळ भरल्यासारखं ठेवण्यास मदत करते. निरोगी शरीर आणि मजबूत स्नायूंसाठी दाळींचे नियमित सेवन करणं गरजेचं आहे.