Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

Uttar Pradesh Aagra Lucknow Car Accident : आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण कार-कंटेनर अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
AGRA-LUCKNOW EXPRESSWAY ACCIDENT: THREE KILLED INCLUDING TWO BROTHERS, FIVE SERIOUSLY INJURED IN CAR-CONTAINER COLLISION
AGRA-LUCKNOW EXPRESSWAY ACCIDENT: THREE KILLED INCLUDING TWO BROTHERS, FIVE SERIOUSLY INJURED IN CAR-CONTAINER COLLISIONSaam Tv
Published On
Summary
  • आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर कार आणि कंटेनरची भीषण धडक

  • अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

  • चालकासह पाच जण गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत

  • अपघाताचे प्राथमिक कारण समोर

Uttar Pradesh Aagra Lucknow Expressway Car Accident उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ महामार्गावर फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला. धक्कादायक म्हणजे या अपघातात कारमधील दोन सख्खे भाऊ आणि एका महिलेचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुरडा झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब बिहारमधून राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका लग्न सोहळ्यासाठी जात होते. प्रवासादरम्यान आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार समोरून जाणाऱ्या कंटेनरला मागून जाऊन धडकले.

AGRA-LUCKNOW EXPRESSWAY ACCIDENT: THREE KILLED INCLUDING TWO BROTHERS, FIVE SERIOUSLY INJURED IN CAR-CONTAINER COLLISION
Petrol Diesel : केंद्र सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपात; १ जूनपासून नवे नियम लागू

धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. वाहनाचा अर्धा भाग कंटेनरमध्ये घुसला होता. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा आरडाओरडा नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कारमधील शंकर कुमार आणि त्यांचा भाऊ सुनील कुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

AGRA-LUCKNOW EXPRESSWAY ACCIDENT: THREE KILLED INCLUDING TWO BROTHERS, FIVE SERIOUSLY INJURED IN CAR-CONTAINER COLLISION
Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अपघातात चालक मोहम्मद शोएब उर्फ सोहैब, परमिता कुमारी, पूजा कुमारी, राजीव कुमार उर्फ राजू आणि अयांश हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, यूपीडीए आणि रुग्णवाहिका पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना फतेहाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघात का झाला? याचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com