Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: सोशल मीडियापासून लांब; एकदा नाही दोनदा UPSC क्रॅक; IRS आरुषी शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IRS Arushi Sharma: आयआरएस आरुषी शर्मा यांनी एकदा नाही दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्या अनेक वर्षे सोशल मीडियापासून आणि मित्रांपासून लांब राहिल्या होत्या.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येकाची काही न काही स्वप्न असतात. स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी अनेक लोक मेहनत करतात. यासाठी अनेक गोष्टींचा त्यांना त्याग करावा लागतो. दिवसातून १५-१६ तास फक्त अभ्यास करावा लागतो. असाच अभ्यास करुन आरुषी शर्मा यांनी यश मिळवलं आहे. (Success Story)

आरुषी या मूळच्या मेरठच्या रहिवासी. त्यांनी दिल्लीतून आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीटेक केले. त्यानंतर इंजिनियरिंग केले. परंतु इंजिनियरिंगमध्ये त्यांचे मन लागले नाही त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी त्यांनी कॅम्पस प्लेसमेंटदेखील सोडली.

आरुषी यांना इंजिनियरिंग सोडून काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे त्या यूपीएससी परीक्षा क्लिअर करण्यासाठी दिल्लीला आल्या. त्यांनी दिवसरात्र एक करुन अभ्यास केला. यूपीएससी परीक्षा त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय सेल्फ स्टडीवर क्रॅक केली. (Success Story Of IRS Officer Arushi Sharma)

आरुषी यांनी खूप मेहनत केली. त्यांनी सोशल मिडिया आणि मित्रांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी २०२१ मध्ये यश मिळवलं. २०२१ मध्ये त्यानी आयआयएस म्हणून सिलेक्ट झाल्या. म्हणजेच त्या इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेलमध्ये सिलेक्ट झाल्या.

आरुषी यांचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली. २०२२ मध्ये त्यांना यश मिळालं. त्या इंडियन रेवन्यू सर्विसेसमध्ये सिलेक्ट झाल्या.आरुषी या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांना नेहमी नवीन काहीतरी शिकायचे होते. त्या सध्या आयआरएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सोशल मिडियावर त्यांचे ६९ हजार फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT