Success Story: आईचे छत्र हरवलं, २ वेळच्या जेवणाचेही वांदे; हार मानली नाही, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक, IAS गोविंद जयस्वाल यांची संघर्ष गाथा

Success Story Of IAS Govind Jaiswal: आयएएस गोविंद जयस्वाल यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. त्यांनी हार न मानता यूपीएससी क्रॅक केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात कितीही अपयश आले तरीही त्यावर मात केली पाहिजे. लोकांनी कितीही नाव ठेवली तरीही त्यातून बाहेर येऊन स्वतः चं वेगळं अस्तित्व निर्माण करायला हवे. यशस्वी होताना आपल्या मार्गात अनेक अडथळे येतात. परंतु हे अडथळे दूर करुन जो व्यक्ती प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. असंच काहीसं आयएएस गोविंद जयस्वाल यांच्यासोबतही झालं.

लहानपणी लोकांनी खूप डिवचलं. वडील रिक्षा चालवतात म्हणून मज्जा घेतली. परंतु तरीही गोविंद यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (IAS Govind Jaiswal Success Story)

Success Story
Success Story: अभ्यासासाठी २ वर्षाच्या मुलाला लांब ठेवलं, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अनु कुमारी यांचा प्रेरणादायी प्रवास

आयएएस गोविंद जयस्वाल हे मूळचे उत्तर प्रदेशमधील वाराणसीचे रहिवासी. त्यांनी लहानपणापासूनच खूप संघर्ष केला. गोविंद यांचे वडिल रिक्षा चालक होते. त्यांच्याकडे ३५ रिक्षा होत्या. गोविंद यांच्या आईला ब्रेन हॅमरेज झाला होता. आईच्या उपचारासाठी वडिलांनी रिक्षा विकल्या. त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. गोविंद सातवीत असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले.

गोविंद यांनी फक्त सुकी चपाती खाऊन उदर्निवाह केला. त्यांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसर केली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींनी ग्रॅज्युएशन केले. (Success Story)

Success Story
Success Story: सरकारी नोकरी सोडली, लॉकडाउनमध्ये ऑनलाइन अभ्यास केला; दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS जागृती अवस्थी यांचा प्रेरणादायी प्रवास

गोविंद यांनी उस्मानापुरा येथील सरकारी शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर हरिश्चंद्र युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांनी २००६ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. ते एकावेळचे जेवण जेवायचे नाही. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय अभ्यास केला.

गोविंद यांनी ट्यूशनदेखील घेतले. त्यातून त्यांचा खर्च भागायचा. २००७ साली त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली अन् ते आयएएस झाले.

Success Story
Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, UPSC परीक्षेत दुसरी रँक; IAS अक्षत जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com