Ranbir Kapoor New Brand ARKS
Ranbir Kapoor New Brand ARKSSaam Tv

Ranbir Kapoor : रणबीर कपूरने केला स्वतःचा ब्रँड ARKS लाँच; आलिया म्हणाली, 'बेबी, तुझं स्वप्न...'

Ranbir Kapoor New Brand : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रणबीर कपूरने स्वतःचा लाइफस्टाइल ब्रँड ARKS लाँच केला. या ब्रँडमध्ये पुरुष आणि महिलांसाठी विविध पर्यायांसह खास कलेक्शन आहेत.
Published on

Ranbir Kapoor New Brand : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रणबीर कपूरच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज मिळाले आहे. रणबीरने आता स्वतःचा लाइफस्टाइल ब्रँड ARKS लाँच केला आहे. वांद्रे येथील २०१ वॉटरफील्ड रोड येथे रणबीरचे हे दुकान आहे. आलिया भट्टनेही तिच्या इंस्टाग्रामवर याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आलिया भट्टने रणबीरच्या ब्रँडच्या काही वस्तूंसोबतचे तिचे फोटो शेअर केले आहेत, यामध्ये कॅप्स आणि शूज दिसत आहेत. आलियाने लिहिले, "मी तुझ्या शूजमधून खरंच आता चालू शकते @ARKS अभिनंदन रणबीर, तुझे स्वप्न पूर्ण झाले आहे."

Ranbir Kapoor New Brand ARKS
Marathi musical Show : अविनाश-विश्वजीत या जोडीकडून प्रेक्षकांना मिळणार सरप्राईज; मुंबईकरांसाठी खास संगीत मैफली लवकरच

रणबीर कपूरने त्याच्या लाइफस्टाइल ब्रँड 'ARKS' लाँच करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्यांच्या ब्रँडचे पहिले स्टोअर मुंबईत सुरू झाले आहे, जे त्याने १४ फेब्रुवारी रोजी सुरू केले. या ब्रँड स्टोअरच्या लाँचिंगवेळी रणबीरच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता.

Ranbir Kapoor New Brand ARKS
Yuzvendra Chahal : डिव्होर्सच्या अफवांमध्ये युजवेंद्र चहलची 'ती' पोस्ट चर्चेत ; चाहते म्हणाले, 'आम्ही तुझ्यासोबत नेहमी...'

ARKS ब्रँड तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे?

या ब्रँडमध्ये कॉटन जर्सी टी-शर्ट, प्लश एम्बॉस्ड फ्रेंच टेरी स्वेटशर्ट, निटेड हूडीज, डबल पिक पोलो शर्ट, फ्लॅट निटेड टी-शर्ट आणि लिनेन शर्ट यांचा समावेश आहे. यामध्ये ऑप्टिक वॉश स्वेटशर्ट्स, कॉटन ट्विल आणि डेनिम शॅकेट्स, स्टायलिश डेनिम बाइकर जॅकेट, अल्ट्रा-लिमिटेड एडिशन लेदर रिव्हर्सिबल बॉम्बर जॅकेट इत्यादींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com