Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story : वडिलांच्या 'त्या' वाक्यामुळे लेकीचं आयुष्यचं बदललं; लकी चौहान झाल्या IPS, वाचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IPS Lucky Chauhan: आयपीएस लकी चौहान यांनी लहानपणीच आयपीएस होण्याचे ठरवले होते. सरकारी नोकरी करता करता त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाचे भलं व्हावं असं वाटतं असतं. त्यामुळे मुलांना वेळोवेळी योग्य वळण लावण्याचे काम ते करतात. आईवडिलांचं ऐकल्यावर मुलांचं नेहमी चांगलंच असतं. असंच काहीस आयपीएस लकी चौहान यांच्यासोबत झालं. वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी (UPSC Exam)परीक्षेची तयारी केली आणि परीक्षा क्रॅकदेखील केली.

लकी चौहान यांचा प्रवास (IPS Luck Chauhan Journey)

लकी चौहान या मूळच्या उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधील खुर्जा गावच्या रहिवासी. त्यांचे वडिल रोहताश सिंह चौहान हे प्रॉपर्टी डीलर आहेत तर आई सुमन लता चौहान शिक्षिका आहेत. लकी चौहान या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि हे यश मिळवलं

वडिलांच्या एका वाक्याने संपूर्ण आयुष्य बदललं

मिडिया रिपोर्टनुसार, लकी चौहान या जेव्हा नर्सरीच्या क्लासमध्ये होत्या. तेव्हा त्यांना एका स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला होता. तेव्हा त्यांना डीएम आणि एसपी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. हे बघून लकी यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, तुलादेखील एसपी किंवा डीएम बनायचे आहे. ही गोष्ट लकीला खूप भावली आणि त्यांनी मोठं होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे ठरवले.

लकी चौहान यांना १२वीपर्यंतचे शिक्षण सायन्समधून केले. यानंतर त्यांनी इंग्लिश लिटरेचर आणि इतिहास विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागली. केंद्रीय मंत्रालयात त्या असिस्टंट वेलफेअर अॅडमिनिस्ट्रेटर पदावर जॉइन झाल्या. परंतु त्यांचे आयपीएस होण्याचे स्वप्न होते. नोकरीसोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

नोकरी करता करता लकी चौहान यांनी यूपीएससी (UPSC)परीक्षेची तयारी केली. तीन वर्षानंतर त्यांनी निवड झाली. २०१२ मध्ये त्यांना ऑल इंडिया रँक २४६ मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT