
आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मागणीने रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि रुग्णसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.
दर्शन रांगेत विठ्ठलाचा जयघोष केला जातो, त्याच दर्शन रांगेत आज मंदिर प्रशासनाच्या कारभाराविरोधात भाविकांनी केली जोरदार घोषणाबाजी
जळगाव शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी
वादळी वारा विजांच्या कडकडाटासह जळगाव शहरासह विविध भागात मुसळधार पावसाची हजेरी..
गेल्या सात ते आठ दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केल आहे...
वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झालंय.
आरोपीने पोटावर आणि मानेवर सपासप वार करून केली युवकाची हत्या, जुन्या वादातून हत्या झाल्याची घटनास्थळी चर्चा
मनीष शेंद्रे अशी हत्या झालेल्या युवकाचे नाव, घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना केल्याची माहिती
- शिंदे यांची शिवसेना म्हणजे फितुरी केलेला पक्ष
- सुधाकर घारे यांची शिवसेनेवर जोरदार टीका
- पळून जाऊन सत्ता स्थापन करणे म्हणजे फितुरीच
- आमचा पक्ष यांच्या सारखा पळून जाणारा नाही
- आमदार महेंद्र थोरवे यांनी टेबलावर केलेल्या डान्सची केली आठवण
- मागील 2 दिवस मुंबईत असताना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता
- हेमंत गोडसे होम क्वॉरंटाइन
शिरुरमधील कान्हूर मेसाई येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झालीय. या प्रकरणी १४ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. नाथा बबन उमाप आणि पांडुरंग अनंता पुळे यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट असून, महिलांच्या हस्तक्षेपातून दोन्ही गटांत मारहाण झाली. घटनास्थळी परस्परांना दगड व लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. शिक्रापूर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक एका प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरल्याचा किळसवाणा प्रकार पुण्यातील यशवंतराव नाट्यगृहात घडला.
जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.चक्क एका महिलेने शासकीय अनुदानासाठी आपल्या पतीला मृत दाखवून शासकीय अनुदान लाटण्याची घटना समोर आली आहे. जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील ही घटना असून यासंदर्भात खुद्द पतीनेच जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करून ही घटना उघडकीस आणली आहे.
- आरोग्य विभागात नोकरी लावून देण्यासाठी 90 जणांची फसवणूक.
- माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या नावाचा वापर केल्याचा संशय.
- आरोग्य विभागात विविध पदांवर पद भरतीच्या नावाने दीड कोटी रुपये उकळले.
- नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक.
- नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कविता भदाणे आणि वैभव पोळ या दोघांविरोधात गुन्हा दाखल.
जेसीबी व्यवहारातुन फसवणुक प्रकरणात हगवणे ला न्यायालयातुन पोलीस कस्टडी मिळणार कि पुन्हा न्यायालयीन कस्टडीत रवानगी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे
- सातपूरच्या अशोकनगर भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट
- नाशिक शहरासह सिडको, सातपूर या भागात घरफोडी,चैन स्नेचींग, मोबाईल चोरी या प्रकारांमध्ये वाढ झालीय. सातपूरच्या अशोक नगर भागात मध्यरात्री दीड वाजेच्या दरम्यान भुरट्या चोरांनी घराच्या बाहेर उभी असलेली रिक्षा चोरून नेली. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.
मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनाच पुणे पोलिसांकडून अडवणूक
अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अडवणूक
पुण्यातील ऍग्रो हॅकेथॉन मध्ये पुणे पोलिसांची "अनोखी कार्यतत्परता" समोर
मंत्र्यांच्या अनेक सुरक्षा रक्षकांना कार्यक्रमस्थळी अडवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री यांच्या आगमनानंतर गोंधळणारी परिस्थिती
मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या मंचावर जात असताना पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा अडवले
मालेगावच्या गिरणा नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या सांडव्याच्या भिंतीवरून काही टवाळखोर तरुणांकडून जीव धोक्यात घालून उड्या मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या स्टंटबाज तरुणांपैकी बहुतेक मुले ही अल्पवयीन आहेत.
लता आणि शशांक हगवणे यांचा ताबा महाळुंगे पोलिसांना मिळालेला असून, पोलिस त्यांना घेऊन सध्या मार्गस्थ झाले आहेत. त्यांचे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना खेड़ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जेसीबी मशीन विक्री व्यवहार प्रकरणी महाळुंगे पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने महाळुंगे पोलिसांनी त्यांना अटक केली असून, पुढील तपासासाठी त्यांना ताब्यात घेतले आहे.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील चणेगाव या ठिकाणी गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी जलजीवन मिशन योजने विरोधात थेट टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय. मागील 18 महिन्यांपासून या गावात जलजीवन मिशनचे काम सुरू असून अद्यापही गावकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी मिळालं नसल्याने हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत.
ओबीसींना जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही असा आरोप करत आम्हाला चुत्या समजता का असे शब्दात लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप सहित व सर्व पक्षांना त्यांची जागा दाखवून असा इशाराही हाके यांनी दिला. काही दिवसापासून लक्ष्मण हाके उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकेरी भाषेत उल्लेख करत टार्गेट करताना पाहायला मिळतात आज देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सरकून टीका केली. मात्र अजित पवार यांच्या बरोबरच हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही टीका केली. यावेळी त्यांची जीभ घसरली.
पुणे-सातारा महामार्ग नसरापूर येथे काल दुपारी ब्रिजवर पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसचा टायर अचानक निघाल्यामुळे लघु अपघात घडला.
अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडी सुमारे ५० फूटपर्यंत घसरत गेली.
पकाही वेळापूर्वी टायरची पंचर काढण्यात आली होती, मात्र ते व्यवस्थित बसवले न गेल्याने हा प्रकार घडल्याचे दिसते.
या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.पर्यायी मार्गदेखील ठप्प झाले आहेत.
पंतप्रधान मोदींनी ज्या शेतात पाहणी केली त्याच शेतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी साधला शेतमजूराशी संवाद,दाभडी येथील कैलास आरणकर या शेतकऱ्याच्या शेतात 20 मार्च 2014 रोजी नुकसान झालेल्या सोयाबीन या पिकाची केली होती पाहणी.दरम्यान काॅग्रेसने शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा सुरू केलीये.यावेळी सपकाळ सोबत अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी..
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील तळ्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदेश दत्ताराम घडशी असं या 17 वर्षीय या युवकाचं नाव आहे.. तो मूळचा देवरूखचा आहे. घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे. आपल्या मित्रांसोबत रत्नागिरीतील सोमेश्वर तळे येथे तो पोहण्यासाठी गेला होता.
सोलापुरातील कोंतम चौकातील धाकटा राजवाडा परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून तुफान राडा झालाय.दोन गटात झालेल्या या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होतोय.हातात रॉड,बॅट आणि दगडाच्या सहाय्याने झालेल्या या हाणामारीत दोन्ही गटातील सात जण जखमी झालेत.भांडणाची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.या प्रकरणी सोलापुरातील जोडभावी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पराविरोधात फिर्याद दाखल करण्यात आलीय.दोन्ही गटातील जवळपास 15 लोकांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय.तर सर्व जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येतायत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम बीडच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणीला होणार सुरुवात.
नेरळ-माथेरान या नॅरोगेज मार्गावर चालणारी मिनिट्रेन पावसाळी चार महिने बंद रहाणार आहे. 1 जून ते 15 ऑक्टोबर पर्यंत ही सेवा बंद राहणार असून अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरळीत आपल्या नियोजित वेळेनुसार धावणार आहे. दरम्यान प्रत्येक शनिवारी रिकाम्या बोगी घेऊन नेरळ हुन मिनिट्रेन सुटेल व माथेरानमध्ये आल्यानंतर शटल सेवेमध्ये रूपांतर केले जाणार आहे. तसेच मालवाहू मिनिट्रेन दररोज चालविली जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात पुन्हा एखदा बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.तालुक्यातील ब्रम्हगावात येथील हिंगणकर यांच्या वस्तीवरील रेड्यावर बिबट्याने हल्ला चढवला असुन रेड्याला 150 फुटांपर्यंत ओढत नेत त्याचा फडशा पाडलाय.दोन महीन्यापुर्वी तालुक्यातील कपीलापुरी येथे बिबट्याला पकडले होते परंतु पुन्हा एखधा बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे त्यामुळे पशुपालकांची काळजी वाढली असुन वर्षभरात बिबट्याने तालुक्यातील 20 ते 25 जनावरांवर हल्ला केला आहे.त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
लातूर सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.. औसा शहराकडून लातूरकडे येणारी एक कळ्या रंगाची स्कार्पिओ दुभाजकाला आदळल्याने थेट रस्त्याच्या कडेला दोनशे फूट फरपटत पडली.. या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे... मात्र सुदैवाने कार मधील चालक आणि इतर दोघांनी सीट बेल्ट लावल्यामुळे तिघांचाही जीव बचावला आहे.... दरम्यान या अपघातात किरकोळ जखमी असणाऱ्या प्रवाशांवर सध्या लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..
सिंधुदुर्ग : ग्रामसेवकांच्या आंतर जिल्हा बदलीतून जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. जिल्ह्यात 432 ग्रामपंचायती असून त्यासाठी केवळ 317 ग्रामसेवक कार्यरत आहेत. तर 115 ग्रामसेवक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका ग्रामसेवकावर दोन दोन ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आला असून परिणामी ग्रामपंचायतींचा कारभार धिम्या गतीने सुरू आहे. विविध योजनांची कार्यवाही ठप्प आहे. असे असताना जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे आर्थिक देवाण-घेवाणीतून जिल्ह्यातील ग्रामसेवकांना जिल्हा बाहेर बदली मिळवून देत आहेत. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
येत्या 13 ते 17 या तारखेच्या कालावधीत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्ह्यात 7, 8, 9 या तारखेला बहुतांश भागात पाऊस पडणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. काही वर्षांपासून चर्चेत असलेले हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे खाजगी कामानिमित्त सोलापूर शहरात आले होते. यावेळी दैनिक सकाळशी बोलताना त्यांनी सांगितले की येत्या 72 तासात सोलापूर शहर आणि परिसरात पाऊस पडेल.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इथं पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर तिघे जण जखमी झाले. जखमींमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुने माणगाव इथं पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून महाड कडे जाणाऱ्या बसने रिक्षाला धडक दिली. यात चौघे जखमी झाले. यातील अशोक सोनार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावरील अपघात अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत, मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर डोणगाव जवळ भरधाव वेगात जाणारी कार ट्रकला धडकल्याने कारचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे, चालकाला डूलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, भूषण बळीराम मगर असे मृतक व्यक्तीचे नाव असून ते वाशिम जिल्ह्यातील मानका येथील रहिवासी आहेत, छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या कारणे समृद्धी महामार्गावरून घराकडे जात असताना हा अपघात घडला आहे...
मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे मुंबईच्या सांताक्रुज वाकोला परिसरात देखील रात्रीच्या वेळी एमटीएनएलचे केबल चोरीची घटना उघडकीस आली आहे वाकोला पोलीस ठाण्याच्या 100 मीटर अंतरावर असणाऱ्या एका मॅन हॉल मधून एम टी एन एल चे केबल चोरी करणाऱ्या चोराला वरिष्ठ अधिकाऱ्याने रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे चोरीच्या घटनेपासून 30 मीटर अंतरावर पोलिसांची नाकाबंदी देखील सुरू होती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून केबल चोर, एमटीएनएलचा माल, टेम्पो, जेसीबी पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. या चोरीत काही भंगार विक्रेते आणि काही एमटीएनएल कामगारांचाही सहभाग असल्याचे शंका पोलिसांकडून उपस्थित करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सध्या वाकोला पोलिसांकडून तपास सुरू आहे.
- विदर्भात सिकलसेल आणि थॅलिसमियाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे...त्यांना उपचारासाठी मुंबईला जावं लागत होतं, आता हा मोठा दिलासा ठरणार आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे उपचार एम्स नागपूरमध्येच व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आता आर्थिक अर्थसाह्यचा एम्स आणि एनटीपीसीचा सामंजस्य करार झालेला आहे.
- त्यामुळे आता सिकलसेल आणिथॅलिसमियाग्रस्त रुग्णांना मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही...
- एनटीपीसीच्या सीएसआर फंडातून हे बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही आता नागपुरात एम्समध्ये पार पडणार आहे...
- याचा आरोग्य सेवेचा फायदा केवळ नागपूरच किंवा विदर्भवासीयांनाच नाही, तर मध्य भारतातील अनेक रुग्णांना मिळणार आहे.
- जानेवारी ते एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कोरोनाच्या रुग्णात किंचित वाढ झाली आहे
- मे महिन्यात दहा करोना रुग्णांची नोंद झाली आहे, विशेष म्हणजे सर्वाधिक पाच रुग्ण हे एकट्या धरमपेठ झोन मधील आहेत..
- यावर्षी आतापर्यंत एकूण 13 कोरोना रुग्णांचे नोंद झाली असून 11 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत..
- ताप, घसा दुखणे किंवा खवखवणे यासारखे लक्षणे 48 तासानंतर कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने सुचवले आहे.
तक्रारदाराने घरातील दोन जात प्रमाणपत्र बनविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून देखील सहा महिने उलटल्यानंतर ही जात प्रमाणपत्र मिळाले नसल्याने, संबंधित तक्रारदाराने अधिकाऱ्यांशी विचारणा करण्यासाठी कार्यालय गाठले असता, संबंधित अधिकारी त्या ठिकाणी मिळून आले नाही परंतु त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी असलेल्या पेंटरने आपण जात प्रमाणपत्र काढून देऊ आणि संबंधित अधिकाऱ्यांशी आपले चांगले आहे, अशी बतावणी करून तीस हजार रुपये लाचेची मागणी केली, संबंधित तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती दिली, व ही लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रुचून रंगेहात पंटरला ताब्यात घेतले आहे, या संदर्भात लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर महाड नजिक खाजगी बसने पुढे चाललेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. मध्यरात्रीच्या सुमारास नडगाव इथं झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले. जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने कोकणातून मुंबईकडे निघाली होती. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ती बाजूला करण्यात आली असून वाहतूक पूर्ववत सुरू आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सहावी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये होणार आहे या सुनावणीसाठी स्वतः आज सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत या सुनावणी मध्ये वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विष्णूचाटेच्या बीड कारागृहात ठेवण्यासंदर्भातील अर्जावर देखील आज सुनावणी होणार आहे. बीडच्या न्यायालयामध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने प्रकरण चार्ज फ्रेम होऊ शकते.
अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु केली आहे. तर दुसरीकडे कृषी विभागाने खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरु केली. कृषी विभागाकडून ८९ हजार ०८९५ क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्याकरिता १.४३ लाख ६६९ मे. टन रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाने जिल्ह्यात ६ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरणी होणार असल्याचे नियोजन आखले आहे.पिकांची काढणी, मळणी करुन शेतकरी शेत नांगरणे, पाळी मारणे, शेतात सेंद्रीय खत टाकणे, गवत काढणे, गवत फवारणीचे काम करीत असल्याचे चित्र दिसत आहे. कृषी विभागाकडून देखील खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.जिल्ह्यात गतवर्षी ६ लाख ६९ हजार ८४६ हेक्टरवर म्हणजे ९८.२५ टक्के पेरणी झाली होती. कृषी विभागाने यावर्षी खरिपाचे ६ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 जूनला अकोल्यात असणार आहेये.. त्यांच्या या दौऱ्यात विविध विकास कामांचे लोकार्पण, नवीन योजनांची घोषणा आणि थेट जनतेशी संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी दुपारी 1 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा होणार आहे.. या सभेद्वारे ते जनतेशी संवाद साधणार असून, विविध योजना, पायाभूत सुविधा आणि प्रगतीशील उपक्रमांबाबतमाहिती देणारेय. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत सुरु असलेल्या विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणारेय..
अकोला जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि इतर क्षेत्रातील कामांना वेग देण्यासाठी नवीन घोषणा होण्याची शक्यता आहे. सभा व दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहेय.. भाजप कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत.
उल्हासनगर महापालिकेच्या सफाई कामगारवर पूर्व वैमनस्यातून टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना भैय्यासाहेब आंबेडकर नगर मध्ये घडली आहे. जखमी कामगाराला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळीचा मराठवाड्याला जबरदस्त तडाखा बसला. जवळपास ११ हजार हेक्टरवरील उन्हाळी ज्वारी, बाजरीसह हळद, कांदा, केळी, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या नुकसानीचे पंचनामे संथगतीने सुरू असल्याने पंचनामे कधी होणार आणि मदत कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारतायत. मे महिन्यात जवळपास २० दिवस अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा सुरू होता. यात मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांतील ६०० गावांना फटका बसला असून, सात हजारांपेक्षा अधिक शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे. त्यात जवळपास अकरा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये बीड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. एकट्या बीड जिल्ह्यात साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. वीज पडून आठही जिल्ह्यांत मिळून सुमारे ४०० जनावरे दगावली आहेत. हळद, भुईमूग, ज्वारी, कांदा यासह केळी, आंबा या पिकांना मोठा फटका बसला आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात हळद पिकाला मोठा फटका बसला आहे.
जालना शहरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भटके कुत्रे नागरिकांचे अक्षरशः लचके तोडत असताना महानगरपालिका प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नियोजन शून्य कारभार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.शहरामध्ये कुत्र्यांकडून नागरिकांची लचके तोडण्याचे प्रकार रोखण्यासाठी मनपाकडे कोणती उपाययोजना नसल्याचे विदारक चित्र जालन्यात दिसतय. रविवारी एकाच दिवशी तीन जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून लचके तोडले यामध्ये बस स्थानक परिसरात बसचालक गणेश सिंग राजपूत आणि मोहन चव्हाण यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि रहेमान गंज भागात अनस खान या सातवर्षीय चिमुकल्यावर देखील कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याच समोर आल आहे. तरीही महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपयोजना राबविण्यात येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
: धाराशिव जिल्ह्यातील खवा उत्पादकांबाबत शासनाच्या नवीन धोरणांमध्ये तरतुदी करण्याची मागणी कृषी मंत्र्यांकडे भुम येथील खवा क्लस्टरचे प्रमुख विनोद जोगदंड यांनी केलीय सौरऊर्जेवर खवा निर्मीती करणाऱ्या उद्योगासाठी नविन वीज जोडणी घेण्यासाठी महावितरण मार्फत खवा उत्पादकांच्या जागेपर्यंत ट्रान्स्फॉर्मर देऊन वीजपुरवठा देण्याचा खर्च करावा,खवा क्रेडिट कार्ड द्वारे पाच लाख रुपयांवर कर्ज वाटप करण्यात यावे,खवा पॅकेलिंग व मार्केटिंग करण्यासाठी व निर्यात करण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी करण्यात आलीय धाराशिव जिल्ह्यातील भुम,वाशी परीसरात मोठ्या प्रमाणावर खवा उत्पादक असुन या सरमकुंडी येथील पेढे देखील राज्यात प्रसिद्ध आहेत त्यामुळे या व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यात जैवविविधतेसाठी देशी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला सयाजी शिंदे यांच्यासह मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सोमटणे, गहुंजे, इंदोरी, टाकवे बुद्रुक आणि अन्य वनक्षेत्रांमध्ये सह्याद्री देवराईच्या सहकार्याने स्थानिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ही वेळ वृक्षारोपणासाठी अतिशय अनुकूल मानली जातो. मावळात नैसर्गिक पाणी अधिक उपलब्ध असल्याने नवीन रोपे लवकर रुजतात आणि परिसरातील वनस्पती व प्राण्यांची जैवविविधता वाढीस लागते. यामुळे ऑक्सिजन निर्मितीत वाढ होईल आणि वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागेल. या उपक्रमातून पर्यावरण रक्षण, हरित महाराष्ट्र आणि शाश्वत विकास होणार आहे.... दरम्यान यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सयाजी शिंदे या झाडाला पाणी टाकून सुरुवात केली..
शिवराज्याभिषेक दिन ६ जून रोजी सिंहगड किल्ला व शिवभक्त सर्व सामान्य नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.” अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.
राज्य सरकारने ३१ मेपर्यंत गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाच्या अनुषंगाने २९ मे रोजी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू झाली होती.
६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनासाठी गडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली जात असून, त्यापूर्वी संपूर्ण अतिक्रमण हटवण्याचे नियोजन पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे,
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने उन्हाळ्यामध्ये कांदा या पिकाला मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी फटका बसला . यामध्ये रांजणगाव गणपती येथील शेतकरी कुंडलिक गुलाबराव चिखले या शेतकऱ्याचे कांद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून एक एकर मध्ये कांदा लागवड केलेली होती .
सध्याचे कांद्याचे बाजार भाव ढासळत असल्यामुळे दोन रुपये मिळतील या आशेवरती उशिरा केलेली ही कांदा लागवड अवकाळी पावसाने संपूर्ण कांदा सडून खाक झालेला आहे. शेतकऱ्याचा लागवड व एकूण भाग भांडवल खर्च निघालेला नसून शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला असून आपल्या कांद्याचा त्वरित पंचनामा व्हावा व राज्य शासनाकडून व कृषी मंत्राकडून नुकसान झालेल्या कांद्याचे त्वरित पंचनामा व्हावा अशी इच्छा यावेळेस बोलताना व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.