Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: इंजिनियर झाली, कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय क्रॅक केली UPSC; IPS अंशिका वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IPS Anshika Verma: अंशिका वर्मा यांनी इंजिनियरिंग केले होते. इंजिनियरिंग झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय त्यांनी परीक्षा पास केली आहे.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत हा एकमेव मार्ग आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही परीक्षा पास करु शकतात. मग ती परीक्षा आयुष्याची असो वा अजून कोणती. फक्त तुमच्यात अभ्यास करण्याची आणि कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची ताकद असायला हवी. असंच काहीसं अंशिका वर्मा यांनीदेखील केलं. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. (Success Story)

अंशिका शर्मा या मूळच्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील रहिवासी. त्यांनी नोएडामधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नोएडातील गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नोलॉजीमधून बीटेक पदवी प्राप्त केली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंशिका या प्रयागराज येथे आल्या. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. परंतु त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले. पहिल्यांदा अपयश मिळाले तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली.त्या आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. (Success Story Of IPS Anshika Verma)

अंशिका वर्मा यांनी सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात १३६ रँक मिळवली.अंशिका यांचे वडील उत्तर प्रदेशमधील वीज विभागातील रिटायर्ड ऑफिसर आहेत. त्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

Face Acne : पिंपल्स होतील गायब, चेहऱ्यावर लावा 'हा' फेसमास्क

Maharashtra Politics : निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचा भडका! शिंदे सेना-भाजप आमनेसामने

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT