Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: IIT मधून शिकला, दोनदा UPSC क्रॅक, देशात पहिला आला; IAS शुभम कुमार यांची सक्सेस स्टोरी

Success Story Of IAS Shubham Kumar: आयएएस शुभम कुमार यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून इंजिनियरिंग केलं. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यावर मात करुन जो व्यक्ती प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर अपयश आले तर खचून जायचं नाही. याच अपयशातून शिकून पुढे यशाची पायरी चढायची. असंच काहीसं शुभम कुमार यांनी केलं. शुभम कुमार आज एक आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. (Success Story)

शुभम कुमार हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांना स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी अधिकारी व्हायचे होते. मात्र, या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु तरीही त्यांनी कायम प्रयत्न केले.

शुभम हे मूळचे बिहारच्या कटिराहचे रहिवासी.शुभम हे लहानपणापासूनच हुशार होते. त्यांनी पूर्णिया येथे शिक्षण घेतले. त्यानंतर कटिहार आणि त्यानंतर पाटणा येथून शिक्षण पूर्ण केले. शुभम यांना लहानपणापासूनच सरकारी अधिकारी व्हायचे होते. (Success Story Of IAS Shubham Kumar)

शुभम कुमार यांनी आयआयटी बॉम्बे येथून सिविल इंजिनियरिंगमध्ये बीटेक केलं. त्यानंतर त्यांनी शेवटच्या वर्षात यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. या काळात त्यांना एका कंपनीत इंटर्नशिपदेखील मिळाली होती. त्यानंतर त्यांना नोकरीसाठी ऑफरदेखील मिळाली होती. मात्र, त्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची होती. हे त्यांचं ठरलं होतं. त्यामुळे ते प्लेसमेंट ड्राइवलादेखील गेले नव्हते.

शुभम कुमार २०१८ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. परंतु ते अयशस्वी ठरले. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना २९० वी रँक मिळाली. त्यानंतर त्यांची निवड इंडियन डिफेंस अकाउंट सर्विसमध्ये झाली. परंतु त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यांनी २०२० मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यामध्ये त्यांना ऑल इंडियामध्ये १ रँक मिळाली. ते टॉपर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT