Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of UPSC Topper Aditi Chhaparia: आयएफएस आदिती छापरिया यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेत राज्यात टॉप सर्वाधिक गुण मिळवले होते.

Siddhi Hande

IFS आदिती छापरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

दोनदा केली यूपीएससी क्रॅक

लहानपणापासूनच अभ्यासात होत्या हुशार

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते.जर तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवलं आणि मेहनत केली तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळतं. असंच काहीसं गोरखपुरच्या लेकीने केलं आहे.गोरखपुरच्या आदिती छापरिया यांनी यूपीएससी परीक्षेत ९७ रँक प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे.

लहानपणापासूनच सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचे स्वप्न

आदिती छापरिया ( Aditi Chhaparia) या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांचे सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यांनी ऑल इंडिया रँक ९७ प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी आयएएस नव्हे तर आयएफएस अधिकारी होण्याचे ठरवले.

आदिती यांनी सांगितले की, त्यांच्या आईवडिलांनी नेहमी त्यांच्या स्वप्नात साथ दिली. त्यांनी सुरुवातीचे आठवीपर्यंतचे शिक्षण लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये केले. त्यानंतर त्यांनी राजस्थानच्या मेयो गर्ल्स स्कूल अजमेरमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

दहावी,बारावीत टॉपर

आदिती शाळेत खूप हुशार होत्या. त्यांनी १०वीच्या परीक्षेत राज्यात टॉप केले होते. १२वीत त्यांना ९९.५ टक्के गुण मिळाले होते. त्यांनी संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक मिळवला होता. यानंतर त्यांनी दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

कॉलेजमध्ये असतानाच आदिती यांनी सिविल सर्व्हिसची तयारी सुरु केली. त्यांनी २०२३ मध्ये पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यावेळी त्यांनी इंडियन रेलवे प्रोटेक्शन फोर्स सर्विस (IRPFS)मध्ये निवड झाली. परंतु त्यांचे स्वप्न मोठे होते. त्यांनी पुन्हा यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली.

आदिती यांनी घरी राहून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी २०२४ मध्ये यूपीएससी परीक्षेत ९७ रँक प्राप्त केली. चांगली रँक असतानाही त्यांनी आयएएस सोडून आयएफएस होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Candidate List: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाकुणाला मिळाली संधी?

पहलगामची हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती, धर्म विचारून केले चाकूचे वार

Batatyache Dhirde Recipe: खमंग आणि चविष्ट नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा बटाट्याचे धिरडे, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT