Success Story of IAS Sulochana Meena Saam Tv
बिझनेस

Success Story: IAS व्हायचं म्हणून गावकऱ्यांनी खिल्ली उडवली, सुलोचना डगमगली नाही; हिम्मतीनं UPSC क्रॅक केली अन् कलेक्टर झाली, वाचा सक्सेस स्टोरी

Success Story of IAS Sulochana Meena: आयएएस सुलोचना मीना यांनी यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय परीक्षा पास केली आहे.

Siddhi Hande

IAS सुलोचना मीना यांचा प्रेरणादायी प्रवास

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक

कोणत्याही कोचिंगशिवाय परीक्षा पास

प्रत्येकाची काही न काही स्वप्नं असतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी येतात परंतु कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता यायला हवी. असंच काहीसं राजस्थानच्या सुलोचना मीणा यांनी केलं. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

आयएएस सुलोचना मीणा यांचा जन्म राजस्थानमधील सवाई माधोपुर जिल्ह्यात झाला. त्यांचे गाव खूपच जुन्या विचारांचे होते. त्यांच्या गावात मुलींना १०वी-१२वीनंतर शिकवणे हा खूप निर्णय मानायचे. त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न होते की, आपल्या लेकीने डॉक्टर व्हावे. मात्र, त्यांच्या मनात आयएएस व्हायचे स्वप्न होते.

सुलोचना यांचे आईवडिल शेती करायचे. लहान लहान कामातून ते कुटुंबाचा खर्च भागवायचे. त्यांच्या गावात कोणीही आयएएस अधिकारी झाले नव्हते. जेव्हा त्यांनी सांगितले की, मला आयएएस व्हायचे आहे तेव्हा अनेकजण त्यांच्यावर हसले.परंतु त्यांनी आपला निर्धार पक्का केला.

सुलोचना यांनी दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्या एनएसएसमध्ये जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला होता.

कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससी क्रॅक

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर सुलोचना यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी कोणतेही कोचिंग लावले नाही. त्यांनी रोज ८-९ तास अभ्यास केला. त्यांनी खूप मेहनतीने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्यांनी २०२१ मध्ये सिविल सेवा परीक्षा पास केली. त्यांच्या या यशाने त्यांच्या आईवडिलांना खूप आनंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT