

IFS अपाला कर्नल यांचा प्रेरणादायी प्रवास
डॉक्टर सोडून झाल्या IFS अधिकारी
वडील सैन्यात कर्नल तर आई प्रोफेसर
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएसस परीक्षा पास होऊन अनेकांना आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायचे असते. यूपीएससी परीक्षा पास करुन तुम्ही सरकारी विभागात अधिकारी पदावर काम करु शकतात. फक्त यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करायचा आगे. असाच अभ्यास अपाला मिश्रा यांनी केला. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी डॉक्टरची प्रॅक्टिस सोडली.
वडील सैन्यात कर्नल
अपाला मिश्रा या मूळच्या उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यातील रहिवासी. त्यांच्या कुटुंबाकडूनच त्यांना यूपीएससी परीक्षा देण्यासाठी प्रेरणा मिळाला. त्यांचे वडील अमिताभ मिश्रा हे सैन्यात कर्नल होते. त्यांचे भाऊ अभिलेष हे आर्मीत मेजर आहेत. तर आई प्रोफेसर आहेत.
डॉक्टर सोडून दिली यूपीएससी
अपाला यांनी देहारादून येथून १०वीची परीक्षा पास केली. त्यांन १२वीपर्यंतचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले. यानंतर त्यांनी आर्मी कॉलेजमधून बीडीएसची डिग्री प्राप्त केली. यानंतर त्या डेन्टिस्ट झाल्या. परंतु तरीही त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याच निर्णय घेतला
डॉक्टरचे शिक्षण घेतानाच त्यांच्या मनात सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा विचार आला. त्यांनी डेंटल प्रॅक्टिससोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांना पहिल्या दोन प्रयत्नात अपयश मिळाले परंतु त्यांनी हार मानली नाही. अपाला मिश्रण यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी आयएएस अधिकारी होण्याऐवजी IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्विसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.