Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: रेल्वे स्टेशनवर हमाली, लेकीसाठी स्वप्न बघितलं; UPSC मध्ये तिनदा अपयश, तरीही खचले नाहीत, आता आहेत IAS ऑफिसर

Success Story Of IAS Sreenath: रेल्वे स्टेशनवर हमाली करायचे. लेकीचे आयुष्य चांगले व्हावे यासाठी यूपीएससी परीक्षा द्यायचे ठरवले. यूपीएससी परीक्षेत तिनदा अपयश आले. तरीही हार न मानता प्रयत्न केले.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनतीला दुसरा पर्याय नाही. कामात सातत्य आणि मेहनत केल्याने प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. असंच यश आयएएस श्रीनाथ यांनी मिळवलं आहे. श्रीनाथ यांनी आपल्या लेकीसाठी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. ते आधी रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करायचे.

इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर श्रीनाथ यांनी यश मिळवले आहे. श्रीनाथ यांनी मुलीचे आयुष्य सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. यूपीएससी परीक्षा देताना त्यांना अनेक अडचणी आल्या. परंतु त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली. (Success Story)

श्रीनाथ हे मुळचे केरळ येथील मुन्नारचे रहिवासी.ते एर्नाकुलम रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करायचे. या कामातून त्यांना जास्त पैसे मिळायचे नाही. या पैशातून त्यांच्या मुलीचे पालनपोषण ते करु शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी हमालीचे काम करत असतानाच स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला.

श्रीनाथ यांचे उत्पन्न एवढे नव्हते की ते यूपीएससी परिक्षेसाठी कोचिंग क्लासेस जॉइन करतील. त्यामुळे त्यांनी सेल्फ स्टडी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे स्टडी मटेरियल खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफायचा वापर करुन अभ्यास केला. त्यांनी केरळ लोक सेवा आयोगमध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारी केली. (Success Story Of IAS Sreenath)

केरळ लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत पास झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तीन वेळा अपयश आले परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. आज ते आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. (Coolie To IAS Officer)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: थकीत बिलासाठी कंत्राटदारचा आत्मदहनाचा प्रयत्न

Actress Accident: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, बसनं दिली धडक

Kangana Ranaut: 'डेटिंग अ‍ॅप्स 'गटार' आहेत'; कंगना रनौतला नाही आवडत डेटिंग अ‍ॅप्स, कारण सांगत म्हणाली...

MLA Ashish Deshmukh : बाईकवर स्टंट करणं भाजप आमदाराला पडलं महागात, पोलिसांनी केली मोठी कारवाई; VIDEO व्हायरल होताच...

New cancer diagnosis method: आता केवळ आवाजाने समजणार तुम्हाला कॅन्सर झालाय ते; शास्त्रज्ञांनी शोधली नवी पद्धत

SCROLL FOR NEXT