आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती त्याच्यावर मात करुन सतत प्रयत्न करत असतो त्याला नक्कीच यश मिळते. असंच यश आयएएस मोहम्मद अली शिहाब यांना मिळालं आहे. मोहम्मद अली शिहाब यांनी खडतर परिस्थितीवर मात करुन खूप मोठं यश मिळवलं आहे. (UPSC)
आयएएस ऑफिसर मोहम्मद अली शिहाब यांचे बालपण अनाथाश्रमात गेले. त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. मोहम्मद शिहाब यांचा जन्म १५ मार्च १९८० रोजी केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोरोट अली आणि आईचे नाव फातिमा असे होते.
मोहम्मद शिहाब यांनी आपल्या वडिलांसोबत बाबूंच्या टोकरी आणि सुपारी विकायला सुरुवात केली. लहानपणीच मोहम्मत शिहाब यांच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी आईवर आली. (Success Story Of IAS Mohammad Shahib)
अनाथाश्रमात बालपण (Live in Orphanage)
मोहम्मद यांच्या आईने नोकरी करुन आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले. गरीबी असल्याने त्यांनी मोहम्मत शिहाब आणि त्यांच्या बहीण-भावंडांना अनाथाश्रमात सोडले. अनाथाश्रमात त्यांनी खूप मन लावून अभ्यास केली. त्यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण अनाथाश्रमात केले. त्यानंतर २०११ साली त्यांनी २२६ रँक मिळवून यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
तिसऱ्या प्रयत्नात आयएएस ऑफिसर
मोहम्मद शिहाब यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. नागालँड कॅडरमध्ये ते आयएएस ऑफिसर म्हणून रुजू झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.