Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आधी डॉक्टर झाली, संसार अन् मुलाला सांभाळून दिली UPSC; दुसऱ्याच प्रयत्नात यश; डॉ. प्रगती वर्मा यांचा प्रवास

UPSC Success Story Of Dr Pragati Verma: यूपीएससी परीक्षा देण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. डॉ. प्रगती वर्मा यांनी मुलं अन् संसार सांभाळून परीक्षा दिली आणि त्यात यशदेखील मिळवले.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा पास करणे हे खूप कठीण आहे. यूपीएससी परीक्षा पास करायची असेल तर दिवसरात्र अभ्यास करावा लागतो. परंतु अनेकांना या प्रवासात अपयश येते. परंतु कितीही अपयश आले तरीही ईमानदारीने मेहनत केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. असंच काहीसं डॉ. प्रगती वर्मा यांच्यासोबत झालं. त्या डॉक्टर आहेत. त्यांनी लग्न झाल्यानंतर मुलांना सांभाळत यूपीएससी (UPSC)परीक्षा दिली.

डॉ. प्रगती वर्मा (Dr Pragati Verma)

डॉ. प्रगती वर्मा या मूळच्या हरियाणातील रोहतक जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण महम येथून पूर्ण केले. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी MBBS पंडित भगवत दयाल शर्मा पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रोहतक येथून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एमडी रेडियोडायग्नोसिसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी AIIMS आणि PGIMER चंदीगढ येथे सिनियर रेजिडंट पदावर काम केले.

यानंतर त्यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगादेखील झाला. त्यानंतर डॉ. प्रगती वर्मा या हरियाणातील प्रायव्हेट आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये रेडियोलॉजी कंसल्टंट म्हणून काम करायचे. त्याचवेळी त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्यात निर्णय घेतला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये नोकरी करता करता परीक्षेची तयारी केली. त्यांनी २०२१ मध्ये पहिला अटेम्पट दिला. त्यात त्या क्लिअर झाल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना ७४० रँक मिळाला.

प्रगती यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०२३ मध्ये त्यांनी ३५५ रँक प्राप्त केले. यानंतर त्यांनी हरियाणा सिविल परीक्षादेखील दिली. यावेळ त्यांना राज्यात दुसरी रँक प्राप्त झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुकानदार गाफील अन् चोर सराईत; मोबाईल चोरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Food Reels : सतत फूड कंटेंट असलेल्या रिल्स पाहताय?, मग ही बातमी वाचाच

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

Heavy Rain : जालना, बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक भागात पूरजन्य स्थिती, घरांमध्ये शिरले पाणी

AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT