Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची; MBBS केलं, हॉस्पिटलमध्ये नोकरी करत UPSC क्रॅक; IAS नागार्जुन गौडा यांची यशोगाथा

Success Story Of IAS Nagarjun Gowda: आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती आली तरीही जो व्यक्ती प्रयत्न करत असतो त्याला नक्कीच यश मिळते. असंच काहीसं नागार्जुन गौडा यांच्यासोबत झालं.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यूपीएससी परिक्षेत पहिल्या प्रयत्नात खूप कमी लोक यशस्वी होतात. असंच काहीसं IAS डॉक्टर नागार्जुन बी गौडा यांच्यासोबत झालं. त्यांनी खूप कठीण परिस्थितीत यश मिळवले.

नागार्जुन गौडा हे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्यांची बायकोदेखील आयएएस आहे. आएएस सृष्टी देशमुखशी त्यांनी लग्नगाठ बांधली. नागार्जुन यांनी खूप खडतर परिस्थितीत यूपीएससी परीक्षा दिली. त्यांच्याकडे सुख-सुविधा नव्हत्या. तरीही त्यांनी प्रयत्न केले. (IAS Nagarjun Gowda Success Story)

नागार्जुन बी गौडा यांचा जन्म ९ मे १९९२ रोजी कर्नाटकमधील छोट्या गावात झाला. त्यांनी गावातील प्रायव्हेट कम्युनिटी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची होती. त्यांच्याकडे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे नव्हते. परंतु त्यांनी याचा कोणताही परिणाम आपल्या अभ्यासावर पडू दिला नाही. (Success Story)

नागार्जुन यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मेडिकलची एंट्रंस परीक्षा दिली. त्यानंतर एमबीबीएस पदवी मिळवली. एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी रेजिडेंट पदावर काम केले. काम करता करता त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांची परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या बिकट असल्याने ते नोकरी सोडू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना नोकरी करत अभ्यास करावा लागत होता.

त्यांनी खूप स्मार्ट पॅटर्नने अभ्यास करुन सरकारी नोकरीची तयारी केली. त्यांनी मागील वर्षाचे पेपर आणि मॉक टेस्ट दिल्या. यामुळे त्यांचा खूप वेळ वाचला. त्यांनी यूपीएससी २०१८ मध्ये ४१८ रँक मिळवली.

नागार्जुन यांनी पत्नी सृष्टीदेखील सरकारी अधिकारी आहे. त्यांनी २०२२ मध्ये लग्न केले. त्यांची ओळख मसूरीमधील LBSNAA म्हणजेच आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये झाली. ते दोघेही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT