Dr. Babasaheb Ambedkar: सातारा हायस्कूल ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स.., बाबासाहेबांचं शिक्षण कुठं कुठं झालं? पदवीची यादी व्हायरल

Dr. Babasaheb Ambedkar Education Degress List: डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पदवीशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बी.आर. आंबेडकरांच्या पदवींची यादी आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Education Degress List
Dr. Babasaheb Ambedkar
Published On

Dr Babasaheb Ambedkar Education Degree List : राज्यसभेत संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्त झालेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं भाषण खूप व्हायरल होत. या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या कथित टिप्पणीवरून विरोधकांनी टीकास्त्र सोडले, संसदेत गदारोळ घातला. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून टीका केली जात असून शहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले, माझ्या भाषणाची अपूर्ण क्लिप चालवण्यात आलीय. त्या माझ्या भाषणाचा विपर्यास करण्यात आलाय. याचदरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या पदवीची यादी व्हायरल होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदवींची यादी युट्यूबर ध्रुव राठी याने शेअर केलीय. दरम्यान आंबेडकर यांच्या पदवीची यादी पाहून आपल्याला त्यांच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज लावता येतो. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी, कोणत्या महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली याचा उल्लेख आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि त्यांची प्रतिमा किती शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे हे लक्षात येईल.

हा फोटो शेअर करताना ध्रुव राठी याने पावर ऑफ एज्युकेशन असं कॅप्शन दिलंय. डॉ. बाबासाहेबांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे तर माध्यमिक शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून केले. १९१३ मध्ये त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात बीए केले. तर कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्कमधून शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी एमए आणि पीएचडी पूर्ण केली.

त्यावेळी, १९२१ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एम.एस्सी. यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ग्रे-इन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण आर्थिक अडचणींमुळे ते १९१७ मध्ये भारतात परतले. येथे ते सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच ध्येय फक्त लंडनला जाऊन शिक्षण पूर्ण करणं हेच होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या मित्राकडे पैसे उसने घेऊन आणि स्वतःची बचत वापरून, ते लंडनला परत शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी एमएससी आणि डीएससी पूर्ण केली. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यसभेचे सदस्य बनवण्यात आले. बाबासाहेबांनी यावर्षी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाने डी.लिट पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे यश पाहून यूजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत. ध्रुव राठीच्या या पोस्टवर अनेक यूजर्सनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, भारतात बाबासाहेबांपेक्षा जास्त पदवी क्वचितच कोणाकडे असेल.

दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, हे पाहून लोकांना समजले पाहिजे की, कोणाच्या तरी घरावर झेंडा फडकावून, धार्मिक स्थळाबाहेर प्रक्षोभक घोषणाबाजी करून आणि कानवड यात्रा करून काहीही साध्य होणार नाहीये. जे काही साध्य होईल ते शिक्षणानेच मिळेल. त्यामुळे नेते आपल्या मुलांना परदेशात पाठवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com